|Saturday, February 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये पुन्हा येणार मॉनिटर

‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये पुन्हा येणार मॉनिटर 

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रम सुरू झाल्यापासून सुरवीर सादर करत असलेली गाणी प्रेक्षकांच्या विशेष पसंतीस पडत आहेत. प्रेक्षकांना आतुरता आहे हे जाणून घेण्याची त्यांचा लाडका मॉनिटर, त्याची धम्माल मस्ती पुन्हा एकदा कधी बघायला मिळेल. सूर नवा ध्यास नवा : स्वप्न सुरांचे स्वप्न साऱयांचे कार्यक्रमाच्या बालदिन विशेष भागानिमित्त मॉनिटर म्हणजेच हर्षद नायबळ पुन्हा एकदा सूर नवाच्या मंचावर येणार आहे. मॉनिटर सोबतच अंशिका, चैतन्य, सई हे छोटे सुरवीर देखील येणार आहेत. मंचावर थोडी मस्ती, थोडी कल्ला पुन्हा होणार आहे. त्यामुळे स्पफहा आणि मॉनिटरची धम्माल मस्ती बघायला मिळणार आहे. बालदिन विशेष भाग मॉनिटर आणि छोटे सुरवीर यांच्यासोबत येत्या आठवडय़ामध्ये सोमवार ते बुधवार रात्री 9.30 वाजता कलर्स मराठीवर रंगणार आहे.

आपल्या सगळय़ांचा लाडका मॉनिटर आता शाळेमध्ये जायला लागला आहे. त्यामुळे त्याचे शाळेतले काही किस्से, मस्ती तो आपल्याला सांगणार आहे. तसेच मॉनिटर बम बम बोले हे देखील गाणे सादर करणार आहे. आपल्या सगळय़ांच्याच बालपणीच्या काही आठवणी आहेत ज्या आपण विसरलो नाहीये. महेश काळे आणि अवधूत गुप्ते अशाच काही आठवणी सांगणार आहेत. बालदिनानिमित्त आलेले छोटे सुरवीर त्यांची काही गाणी सादर करणार आहेत.

Related posts: