|Friday, December 6, 2019
You are here: Home » Top News » शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

राज्यात सत्तास्थापन करण्यास भाजप असमर्थ ठरल्याने आता शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपचा ‘प्लॅन बी’ तयार असल्याची माहिती एका वृत्तवाहिनीने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.

शिवसेनेमुळेच राज्यात भाजपला सत्ता स्थापन करता आली नाही. त्यामुळेच राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाल्याचे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी भाजपने रणनिती आखली असून, आज भाजप नेत्यांची वर्षा निवासस्थानी बैठक होणार आहे.

बहुमत असल्याने राज्यपालांनी भाजपला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले होते. त्यासाठी 72 तासांचा अवधी भाजपला देण्यात आला होता. भाजपने असमर्थता दाखविल्यानंतर राज्यपालांनी शिवसेनेला सत्तास्थापनेचे निमंत्रण दिले आहे. त्यासाठी शिवसेनेला 24 तासांचा अवधी देण्यात आला आहे.

सत्तास्थापनेसाठी बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला तारेवरची कसरत करावी लागत आहे. मुख्यमंत्रिपदासाठी आक्रमक भूमिका घेतल्याने शिवसेनेला कोंडीत पकडण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर होत आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपाचे सर्व नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत.

Related posts: