|Friday, December 6, 2019
You are here: Home » leadingnews » शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृतरित्या प्रस्ताव

शिवसेनेकडून राष्ट्रवादीला अधिकृतरित्या प्रस्ताव 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्याकडे सेनेला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. शिवसेनेकडून अधिकृतरित्या प्रस्ताव देण्यात आला आला.

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व शरद पवार यांची  बैठक वांद्र्याच्या हॉटेल ताज लँड्स एन्ड येथे सुरू झाली आहे. या बैठकीला शरद पवार यांच्या सोबत अजित पवार देखील उपस्थित आहेत. 

या बैठकीत सत्तेचे वाटप कसे व्हावे आणि चालू राजकीय घडामोडींवर प्रामुख्याने चर्चा केली जात आहे. सोबतच, राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला पाठिंबा देण्यास काहीच अट नसल्याचे सांगत असले तरीही शिवसेनेकडून मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा होऊ शकते. त्यातही आदित्य ठाकरे यांच्या नावावर राष्ट्रवादीची काय भूमिका असणार हे देखील ठरणार आहे.

दरम्यान, शिवसेनेला सत्तास्थापनेचा दावा करण्यासाठी आज संध्याकाळी 7.30 पर्यंतची वेळ आहे.

 

 

 

Related posts: