|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » हैदराबादमध्ये दोन रेल्वे गाड्याची समोरासमोर धडक

हैदराबादमध्ये दोन रेल्वे गाड्याची समोरासमोर धडक 

ऑनलाईन टीम/हैदराबाद

तेलंगणामध्ये दोन रेल्वे एकाच रुळावर आल्याने त्यांची समोरासमोर धडक झाल्याची घटना घडली. काचेगुडा रेल्वे स्थानकात आज, सोमवारी (दि.11) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या धडकेत पाच प्रवासी जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच रेल्वे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे.

इंटरसिटी एक्स्प्रेस ही कचेगुडा रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्मवर थांबली होती. त्याच प्लॅटफॉर्मवर एमएफटीएम रेल्वे आली आणि या दोन्ही रेल्वेची समोरासमोर धडक झाली. यातील लिंगमपल्लीफलकनुमा रेल्वेचे तीन डब्बे तर कुर्नुल सिटीसिकंदराबाद एक्स्प्रेसचे चार डब्बे हे धडक झाल्यावर रुळावरून घसरले आहेत. घसरलेले डब्बे रुळावरून हटवण्याचे काम सध्या रेल्वे प्रशासनाकडून सुरू आहे. सिग्नलमधील बिघाडामुळे हा प्रकार घडल्याचे सांगण्यात आले. या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाने काही गाडयांच्या वेळापत्रकात बदले केले आहेत.

Related posts: