|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » Top News » शरद पवारांशी चर्चा करून पुढील निर्णय : काँग्रेस

शरद पवारांशी चर्चा करून पुढील निर्णय : काँग्रेस 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली

काँग्रेसराष्ट्रवादी आघाडीने शिवसेनेला वेळेत पाठिंबा न दिल्याने राज्यातील सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. दुसरीकडे काँग्रेसअंतर्गत चर्चेनंतरही पाठिंब्याबाबत निश्चित निर्णय झालेला नाही. बैठकीनंतर काँग्रेस नेत्यांनी पुढील निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलून सोनिया गांधी घेणार असल्याचे सांगितले.

महाआघाडीने वेळेत पाठिंबा न दिल्याने शिवसेना मात्र पुरती कोंडीत सापलडी असून सत्तास्थापनेसाठी राज्यपालांनी दिलेली मुदत संपली आहे. आदित्य ठाकरेंसह राजभवनात गेलेल्या शिवसेना नेत्यांना सत्तास्थापनेचा दावा वेळेत करता आला नाही आणि त्यासाठी मुदतवाढही मिळाली नाही. तर दुसरीकडे काँग्रेस, राष्ट्रवादीत पुढील राजकीय दिशा ठरवण्यासाठी खलबतं सुरुच आहेत. दोन्ही पक्षाचे अध्यक्ष सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात चर्चेनंतरच अंतिम निर्णय होईल, असे काँग्रेस नेत्यांनी सांगितले आहे. त्यामुळे शिवसेनेसह महाआघाडीचे सरकार स्थापन होणार की राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार ? याबाबत उत्सुकता आहे.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली तसेच काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. मात्र सत्तास्थापनेसाठी तीन पक्षांत चर्चा होणे गरजेचे होते. त्यासाठी 24 तासाचा वेळ खूप कमी होता, असे शिवसेनेने म्हटले आहे.

Related posts: