|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » इराकमध्ये निदर्शने, 319 जणांचा मृत्यू

इराकमध्ये निदर्शने, 319 जणांचा मृत्यू 

बगदाद

 मागील महिन्यात सरकारविरोधी निदर्शनांना प्रारंभ झाल्यापासून 319 जण मारले गेल्याची माहिती इराकच्या संसदीय मानवाधिकार समितीने एका अहवालात नमूद केली आहे. या हिंसक निदर्शनांमध्ये सुमारे 15 हजार जण जखमी झाले आहेत. निदर्शक आणि सुरक्षा दलांमधील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. अल खलानी या औद्योगिक भागात लोकांवर सुरक्षा दलांनी गोळीबार केल्याचा आरोप आहे. बगदादपासून 450 किलोमीटर अंतरावरील बसरा या शहरातही या आंदोलनाचे लोण पोहोचले आहे. सुरक्षा दलांनी एका शाळेत चुकून अश्रूधूराचा वापर केल्याने 23 विद्यार्थिनी जखमी झाल्या आहेत.

सरकार मंत्रिस्तरावर महत्त्वपूर्ण सुधारणा करणार असल्याचा दावा इराकचे पंतप्रधान आदिल अब्दुल माहदी यांनी केला आहे. तरुणाईकडून सुरू असलेल्या निदर्शनांमुळे देशभरात उलथापालथ होत आहे. सरकारविरोधी निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी काही दिवसांपूर्वी राजीनाम्याचे संकेत दिले होते.

Related posts: