|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » Top News » भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

भाजप ‘वेट अँड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार 

ऑनलाईन टीम / मुंबई

राज्यात सुरू असणार्‍या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेऊन आहोत आणि आता आमची भूमिका वेट अँड वॉचची आहे, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. आज पुन्हा भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर मुनगंटीवार पत्रकारांशी बोलत होते.

दरम्यान, महाराष्ट्रात सत्तेचा पेच कायम आहे. भाजपने सत्तास्थापनेत असमर्थता दर्शवल्यानंतर शिवसेनेलाही वेळेत सत्तास्थापनेचा दावा सिद्ध करता आला नाही. दिवसभर काँग्रेस, राष्ट्रवादीशी चर्चा करूनही त्यांना पाठिंब्याचे पत्र मिळू शकले नाही.

शिवसेना दावा सिद्ध करण्यास अपयशी ठरल्यानंतर राज्यपालांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तास्थापनेसाठी निमंत्रित केले. त्यानंतर गटनेते अजित पवार यांच्यासह जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, दिलीप वळसेपाटील या राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजभवनात जाऊन राज्यपालांची भेट घेतली. त्यांना मंगळवारी रात्री 8.30 पर्यंत वेळ देण्यात आली आहे.

राज्यपालांच्या निमंत्रणानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेस पक्षाशी चर्चा करून पुढील निर्णय घेणार असल्याचे म्हटले आहे. तर या सर्व घडामोडींत भाजप कोअर कमिटीचीही बैठक झाली. त्यानंतर मुनगंटीवार यांनी पक्षाची भूमिका स्पष्ट करताना आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत असल्याचे सांगितले.

Related posts: