|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ‘वाहनधारक’ महासंघ करणार महापालिकेची ‘नाकाबंदी’

‘वाहनधारक’ महासंघ करणार महापालिकेची ‘नाकाबंदी’ 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पावसाळयात महापूर, दिवाळीतील अवकाळी पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था होऊन चाळण झाली आहे. यामुळे धुळीचे लोट उठुन श्वसनाचे आजार, खडयांमुळे वाहन चालकांना अडथळयांची शर्यत पार करावी लागते. याकडे महापालिका प्रशासनाने अक्षम्य दूर्लक्ष केले आहे. याकडे मनपा प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘वाहनधारक’ महासंघाने मंगळवार दि.19 रोजी महापालिकेची ‘नाकाबंदी’ करण्याचा इशारा दिला आहे. 

आंदोलकांच्या टोपीवर ‘कोल्हापूर की खडड्पूर’ मजकूर

कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघातर्फे सोमवारी शहरातील खराब रस्त्यांविरोधात बिंदू चौकात ‘खडड्यांचे लग्न’ करून अनोखे आंदोलन करण्यात आले. हे लग्न खडी व डांबर यांच्यात करण्यात आले असून आंदोलकांनी पिवळया रंगाच्या टोप्या परिधान केल्या होत्या. त्या टोपीवर ‘कोल्हापूर की खडड्पूर’ असा मजकूर लिहीण्यात आला होता.

13 रोजी रास्ता रोको तर 19 रोजी महापालिकेला घेरावो

नवीन रस्ते कोल्हापूरच्या जनतेला मिळावेत यासाठी वाहनधारक महासंघातर्फे टप्प्याटप्प्याने आंदोलन तीव्र करण्यात येणार आहे. असा निर्धार वाहनधारक महासंघांतर्गत वाहतुकदारातर्फे करण्यात आला आहे. रिक्षावाल्यांच्या वतीने जन आंदोलन छेण्यात आले असून पहिला टप्पा म्हणून बिंदू चौकातील ‘खडड्यांचे लग्न’ हे अनोखे आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत बुधवार दि.13 नोव्हेंबर रोजी दाभोळकर कॉर्नर येथे रास्ता रोको तर मंगळवार दि.19 नोव्हेंबर रोजी महापालिकेला घेरावो आंदोलन करण्यात येणार आहे. यामध्ये वाहनधारक, रिक्षावाले, वाहतुकदार संघटनांचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत.

वाहतुक, वाहनधारक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सहभाग

बिंदू चौकातील खडड्याचे लग्न या अनोख्या आंदोलनावेळी कोल्हापूर जिल्हा वाहनधारक महासंघाचे अध्यक्ष अभिषेक देवणे, महाराष्ट्र वाहतुक सेनेचे अध्यक्ष चंद्रकांत भोसले, रिक्षा मालक सेना राजु जाधव, विजय गायकवाड, दिलीप सुर्यवंशी, काळी-पिवळी टॅक्सी युनियन अध्यक्ष अशोक जाधव, टेंपो ट्रव्हलर संघटनेचे अध्यक्ष इंद्रजीत आडसुळे, निलेश हंकारे आदींसह मिनीडोअर ऍटो रिक्षा, ऍपे रिक्षा, मिनीडोअर सहासिटर आदींसह विविध वाहनधारक संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते. 

Related posts: