|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा ‘छत्रपती शिवाजी’ आज आवतरणार

चित्रतपस्वी भालजी पेंढारकरांचा ‘छत्रपती शिवाजी’ आज आवतरणार 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

शिवभक्त चित्रतपस्वी भालजी पेंढारकर यांची युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील भक्ती साऱया महाराष्ट्राला ज्ञात आहे. त्यांनी छत्रपती शिवरायांच्या शौर्य आणि स्वराज्य निर्मितीवर साकारलेले अनेक मराठी चित्रपट आजही शिवभक्तांसाठी पर्वणी ठरतात. शिवभक्तीचा जागर घालणाऱया भालजी पेंढारकर यांच्या दिग्दर्शनातून साकारलेला आणि जुन्या काळात शिवभक्तांवर गारूड घालणारा छत्रपती शिवाजी हा चित्रपट पाहण्याची संधी नव्या पिढीतील शिवभक्तांसह अबालवृद्धांना  लाभणार आहे. त्याचबरोबर अफझलखानाच्या वधावरील नाटक पाहता येणार आहे.

येथील शिव-शाहू मर्दानी आखाडय़ाच्या वतीने शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून मंगळवार 12 नोव्हेंबर रोजी सायंकाळी सहा वाजता छत्रपती शिवाजी हा चित्रपट आणि अफझलखानाचा वध या नाटकाचे सादरीकरण करण्यात येणार आहे.  शनिवार पेठेतील खोल खंडोबा हॉलमध्ये चित्रपट आणि नाटक मोफत पाहण्याची संधी शिवभक्तांना लाभणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन शिव-शाहू मर्दानी आखाडय़ाचे संस्थापक अमोल बुचडे आणि त्यांच्या सहकाऱयांनी केले आहे.

शिव-शाहू मर्दानी आखाडय़ाच्या वतीने मर्दानी खेळाचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच विविध उपक्रम, स्पर्धांचेही आयोजन केले जाते.

 

Related posts: