|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » छायाचित्रकारास मारहाण, नरेंद्र पाटलांसह तिघांवर गुन्हा

छायाचित्रकारास मारहाण, नरेंद्र पाटलांसह तिघांवर गुन्हा 

प्रतिनिधी/ सातारा

येथील शाहू क्रीडा संकुलात सुरु असलेल्या शासकीय ऍथलेटीक्स स्पर्धेच्यावेळी गेटवर पालकांचा गोंधळ सुरु होता. क्रीडा अधिकाऱयांनी तो चित्रीकरण सांगितल्याने त्याचे चित्रीकरण करत असताना तिथे असलेल्या नरेंद्र पाटील, राम हादगे व बाळा ढेकणे यांनी शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण केली असल्याची तक्रार शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

याबाबत सचिन रामचंद्र लिंबकर (वय 39 रा. बुधवार पेठ, सातारा) यांनी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 10 रोजी कोल्हापूर विभागीय ऍथलेटीक्स स्पर्धा शाहू क्रीडा संकुलात सुरु होत्या. त्यावेळी स्पर्धेचे चित्रीकरण करण्याचे काम सचिन लिंबकर व त्यांचा मित्र पांडेकर यांच्याकडे होते. त्याच दरम्यान सकाळी 10.30 च्या सुमारास गेट उघडण्याच्या कारणातून पालकांचा गोंधळ सुरु होता.

त्यावेळी क्रीडा अधिकाऱयांनी लिंबकर यांना चित्रीकरण करण्यास सांगितले होते. ते चित्रीकरण करत असताना तू चित्रीकरण का करत आहेस असे म्हणत राम हादगे याने शिवीगाळ करत मारहाण केली तर नरेंद्र पाटील व बाळा ढेकणे यांनी शिवीगाळ करत दमदाटी केली. यावेळी तिथे जिल्हा क्रिडा अधिकारी युवराज नाईक  व बाबर हे आले असता त्यांना देखील शिवीगाळ दमदाटी केली असल्याचे लिंबकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक मुगुट पाटील या गुन्हय़ाचा पुढील तपास करत आहेत.

 

Related posts: