|Monday, March 30, 2020
You are here: Home » Top News » भाजपाच्या मिलाफांचा अभ्यास केल्यानंतरच काँग्रेसशी आघाडी : उद्धव ठाकरे

भाजपाच्या मिलाफांचा अभ्यास केल्यानंतरच काँग्रेसशी आघाडी : उद्धव ठाकरे 

ऑनलाइन टीम / मुंबई : 

भाजपाने जम्मू-काश्मीर वा बिहारमध्ये वेगवेगळय़ा विचारधारांशी केलेल्या मिफालाचा अभ्यास करूनच आम्ही महाराष्ट्रात काँग्रेस व राष्ट्रवादीशी आघाडी करण्याबाबत पावले उचलू, अशी भूमिका शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी येथे मांडली.

किमान समान कार्यक्रमानंतरच महाशिवआघाडीवर शिक्कामोर्तब होईल, असे काँग्रेस व राष्ट्रवादीकडून स्पष्ट करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर ठाकरे रिट्रीट हॉटेल येथील पत्रकार परिषदेत बोलत होते. भाजपाची मुदत संपायच्या आतच आम्हाला पत्र आले आणि त्याच वेळेच्या मुदतीत सरकार स्थापन्याविषयी सांगण्यात आले. सत्तेचा शिवसेनेचा दावा आजही कायम आहे. स्थिर सरकार चालवणे, हा पोरखेळ नाही. त्यासाठी आम्हाला 48 तासाची मुदत हवी होती. स्पष्टता आल्याशिवाय आम्ही तिघेही एकत्र येऊ शकत नाही. आता किमान समान कार्यक्रमानंतरच आम्ही पुढे जाऊ, अशी आमचीही भूमिका आहे.

वेगळय़ा विचारधारेचे पक्ष कसे काय एकत्र येणार, असा काहींना प्रश्न पडला असेल. आता मोदी-नितीश कसे एकत्र आले, भाजपा व मेहबूबा सरकार कसे झाले, असाही प्रश्न पडतो. त्यादृष्टीने आम्हीही विचार करू. त्या मिलाफाचा अभ्यास करूनच आघाडी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

 

 

Related posts: