|Sunday, December 8, 2019
You are here: Home » उद्योग » चिनी वाहन कंपन्या भारतात 700 कोटीची गुंतवणूक करणार

चिनी वाहन कंपन्या भारतात 700 कोटीची गुंतवणूक करणार 

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये वाहन क्षेत्रातील विक्री घटत गेल्याने अनेक कंपन्यांनी नवीन गुंतवणूक करण्याकडे पाठ फिरवल्याचे पहावयास मिळाले आहे. परंतु सध्या चिनी कंपन्या भारतात येत्या काळात गुंतवणूक करण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये चीनची कंपनी गेट वॉल मोटर्सने भारतात वाहन क्षेत्रात जवळपास 700 कोटी रुपयाची गुंतवणूक करण्याची योजना आखत आहे.

आगामी काळात भारतात वाहन उत्पादन निर्मितीचा प्रकल्प उभारणार असून त्यासाठी अधिक वेगाने काम करत आहेत. ज्यामध्ये 2022 पर्यंत उत्पादनास सुरुवात करण्यात येणार असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. 

स्पर्धा

ग्रेट वॉल कंपनी भारतात यूटीलिटी वाहन सेगमेंटसोबत स्पर्धा करावी लागणार आहे. एसयूव्ही हेक्टर लाँच केली आहे. त्यासोबत किआ मोटर्सने भारतात दमदार सुरुवात केली आहे. भारतात सेल्टॉस ऑक्टोबरमध्ये विक्रीत तेजीत राहिली आहे.  पेंच पीएसए कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारी दाखवत आहे.

कर सवलत

हॅवेल्स मोटर्स इंडिया इंडियाने गुरुग्राममध्ये ऑक्टोबरमध्ये पहिल्या कार्यालयाची नोंदणी केली होती. तेव्हा 15 टक्क्यांचा कॉर्पोरेट कर लावण्याचा फायदा मिळणार नसून अर्थमंत्री यांनी केलेल्या नवीन कर सवलतीचा फायदा मिळावा यासाठी या कंपन्या सरकारला विनंती करणार आहेत. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू या ठिकाणी ग्रेट वॉल कंपनी वाहन निर्मितीचा प्रकल्प उभारणार आहे. त्यासाठी कंपनीचे अधिकारी औद्योगिक विभागासोबत चर्चा करत आहेत.

Related posts: