|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » पेटीएम ‘टेक स्टार्टअप’मध्ये 500 कोटी गुंतवणार

पेटीएम ‘टेक स्टार्टअप’मध्ये 500 कोटी गुंतवणार 

डिजिटल योजनांना चालना देण्यासाठी प्रयत्न

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

डिजिटल पेमेन्ट कंपनी पेटीएम आगामी काळात पेटीएम टेक स्टार्टअपमध्ये 500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. यामधून कंपनी डिजिटल योजनांना चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. त्यासोबत रोजगार निर्मितीही उपलब्ध होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

पेटीएम 500 कोटी रुपयाची गुंतवणूक करुन कृत्रिम बुद्धीमत्ता या क्षेत्रात आपला दबाव निर्माण करण्याची तयारी करत आहे. या गुंतवणुकीतून कंपनी देशातील विविध भागांमध्ये डिजिटल सुविधांचा प्रसार करण्याचे ध्येय निश्चित करण्याची सक्षम यंत्रणा उभी करत असल्याची माहिती सीएफओ विकास गर्ग यांनी दिली आहे.

गुंतवणुकीचा टप्पा

कृत्रिम बुद्धीमत्ता क्षेत्रात कार्यरत असणाऱया कंपन्यांमध्ये पेटीएम प्रति वर्षी 200 ते 250 कोटी रुपयाची गुंतवणूक करत आली आहे.

Related posts: