|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » दुचाकीने ठोकरल्याने 6 वर्षीय मुलाचा मृत्यु

दुचाकीने ठोकरल्याने 6 वर्षीय मुलाचा मृत्यु 

प्रतिनिधी/ म्हसवड

बेघर वस्तीवरुन दुकानातुन खायाला घेऊन सायकलीवरुन घरी निघालेल्या मयुर नामदेव याला समोरुन आले भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने ठोकरल्याने मयुरचा जागीच मृत्यु झाला तर या अपघातातील दुचाकीस्वारही जखमी झाल्याने त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालय उपचार सुरु असुन तो बेशुध्द असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत म्हसवड पोलीस स्टेशन व घटानास्थळा वरुन समजलेली अधिक माहिती अशी येथील नामदेवस्ती येथे महेश गुलाब नामदे हे आपली पत्नी स्वाती व एकुलता एक मुलगा मयुर यांच्या सोबत रहात आहेत मोलमजुरी करुन जगणारे हे कुटुंब अत्यंत शांत व संयमी म्हणुन या परिसरात ओळखले जाते, तर महेश नामदे यांना असणारा मयुर हा एकुलता एक मुलगा असल्याने तो या वस्तीवर सर्वांचा लाडका होता त्याची बडबड सर्वांनाच मोहित करीत असल्याने सर्वांनाच तो आपलासा वाटावा असा होता, आज सायंकाळी साडे 4 च्या सुमारास तो आपल्या घराशेजारील परिसरात सायकल खेळत होता त्यानंतर आजोबा कडुन पैसे घेऊन बेघर वसाहतीवरील एका दुकानातुन खाऊ घेऊन आपल्या रेन्जर या सायकलीवरुन त्याच्या बाजुने घरी निघाला आसताना  समोरुन भरधाव वेगाने आपल्या दुचाकी क्र.एम.एच.11सी.यु.3577  महेश नंदकुमार होळ याच्याकडील वरील क्रमाकांच्या दुचाकीची मयुर नामदे याच्या सायकलला जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातामध्ये सायकल स्वार मयुर हा रस्त्याच्या बाजुला फेकला गेला त्याच्या डोक्याला अंतर्गत मोठी इजा झाल्याने त्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यु झाला, तर दुचाकीस्वार महेश होळ हा ही या अपघातामध्ये दुचाकीवरुन पडल्याने तो ही गंभीर जखमी झाला असुन त्याच्यावर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

दरम्यान सदर अपघाताचे वृत्त शहरात पसरताच अनेकांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात धाव घेतली यावेळी आरोग्य केंद्राबाहेर मोठी गर्दी उसळली तर अनेकांनी या अपघाताबाबत हळहळ व्यक्त केली. सदर अपघाताची नोंद मयत मयुर याचे चुलते सुरेश नामदे यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला देताच पोलीसांनी मृत मयुर याचे शव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात 5 वाजता आणले मात्र याठिकाणी शवविच्छेदन करणारी व्यक्तीच उपलब्ध नसल्याने रात्री उशीरा मयुर याच्या मृत्युदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले मयुर हा एकुलता एक मुलगा होता विवाहा नंतर  सात वर्षा नंतर मयुर झाला होता वडिल गेले पाच वर्षा पासुन आजारी आसल्याने ते झोपुन आहेत आजोबाचा मयुर लाडका नातु आसल्याने रात्री दहा पर्यात त्यांना या आपघाताची माहिती देण्यात नव्हती  रात्री उशीरा मयुर नामदेव यांच्यावर अत्यंत शोकाकुल वातावरणात   अंत्यसंस्कार करण्यात आले.

Related posts: