|Monday, December 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » महामार्गाच्या कामाला महिन्याची डेडलाईन

महामार्गाच्या कामाला महिन्याची डेडलाईन 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा ते पुणे दरम्याणच्या पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाची खड्डय़ांमुळे दुरावस्था झाली आहे. त्याबाबत नागरिकांनी टोल विरोधात उठाव केला आहे. रस्त्याचे काम न झाल्यास टोल दिला जाणार नाही असा पवित्रा नागरिकांनी घेतला आहे. त्यामुळे लवकरात लवकर रस्त्याचे काम पूर्ण करा अन्यथा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (न्हाई) ला सार्वजनिक उपद्रव केल्या प्रकरणी नोटीस बजावा असे आदेश पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिले आहेत. त्यासाठी एक महिन्याची डेडलाईन न्हाई ला देण्यात आली आहे.

पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्या प्रमुख उपस्थीतीत बैठक पार पडली, त्यामध्ये ते बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, निवृत्त सनदी आधिकारी संभाजीराव झ़ेंडे यांची बैठकीला प्रमुख उपस्थिती होती. बैठकिचे संयोजन रश्मी कामेटकर यांनी केले. यासाठी साताऱयाचे पराग यादव, विराट राजेघाटगे, यांच्यासह पवनजीत माने, संतोष देशपांडे यांनी उपस्थित होते. दरम्यान या बैठकीत खेडशिवापूर रस्त्याच्या प्रश्नांवर चांगलीच वादळी चर्चा झाली.

कोल्हापूरचे संतोष देशपांडे यांनी महामार्गावरील असुविधांच्या प्रश्नांना चर्चेत आणले. गेल्या दहा वर्षापासून या राष्ट्रीय महामार्गावर प्रवास करत असताना अनेकांना अपंगत्व आले आहे तर काहींना आपला जीव गमवावा लागला असल्याचे देशपांडे यांनी सांगितले. तर साताऱयाचे पवनजीत माने यांनी आक्रमक होत रस्तेच नीट नाहीत तर टोल घेणे म्हणजे आमची लूट करत असल्याचे सांगितले. त्यांच्या बोलण्याचे समर्थन करत गोगावलेवाडीचे सरपंच अशोक गोगावले म्हणाले, गेल्या रस्त्याची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे झालेले अपघात यांचा लेखाजोखा मांडला. बैठकीत उपस्थितांनी आक्रमक  पावित्रा घेतल्याने जिल्हाधिकारी यांनी यात लक्ष घातले.

ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षांपासून खेडशिवापूर येथील रस्त्याचे काम रखडले आहे. त्यामुळे येथील रस्त्याची बिकट अवस्था निर्माण झाली आहे. हा रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग विकास प्राधिकरण (न्हाई) मागत असलेली मुदत एक महिन्यापर्यंत वाढवू. मात्र जर एक महिन्यात हे काम पुर्ण नाही झाले तर सार्वजनिक उपद्रव निर्माण केल्या प्रकरणी नोटीस बजावण्याचे आदेश देण्याचे आले आहेत.  तसेच संबंधित आधिकाऱयांनी दर आठवडय़ाला कामाचा आहवाल सादर करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

Related posts: