|Friday, December 6, 2019
You are here: Home » आवृत्ती » पुणे » कलावर्धिनीच्या वतीने ‘मुकुल’ कार्यक्रमाचे आयोजन

कलावर्धिनीच्या वतीने ‘मुकुल’ कार्यक्रमाचे आयोजन 

 ऑनलाईन टीम / पुणे :

कलावर्धिनी नृत्यशालेच्या वतीने ‘मुकुल’ या कार्यक्रमाचे आयोजन उद्या (14 नोव्हेंबर) रोजी कोथरूड येथील बालशिक्षण ऑडीटोरियम येथे सायं 6 वाजता करण्यात आले आहे. कलावर्धिनी नृत्यशालेच्या संचालिका अरुंधती पटवर्धन यांनी ही माहिती दिली.

नऊ ते चौदा वर्षांमधील शिष्यांना कलागुण सादर करता यावेत, यासाठी कार्यक्रमाचे आयोजन दरवषी करण्यात येते. सर्वांसाठी मोफत असणाऱया या कार्यक्रमात अरुंधती पटवर्धन यांच्या शिष्या उन्मेशा बांदल, श्रावणी साने, प्रांजल केदारी, फाल्गुनी ओझा, राधिका कुंटे, रिया आढाव भरतनाटय़मची प्रस्तुती करणार आहेत.

अमोल निसाळ यांचे शिष्य मैत्रियी भोसले, रुचा महामुनी, शार्दुल काणे, करण देवगांवकर, केदार जोग व आलापिनी निसाळ गायनकला, सौरभ वर्तक यांचे शिष्य आलाप चौधरी व अभिरा काळे यांचे बासरीवादन, नेहा मुठीयान यांच्या शिष्या सारा मेहेंदळे, स्वरा कुलकर्णी, अदिती भांबुरकर, गार्गी शास्त्री, सानिका धीडे, तन्वी लिमये, सिया मुठीयान या कथक प्रस्तुत करणार आहेत. शिल्पा दातार यांच्या शिष्या फातिमा शेख, कोमल दुधाने, रिंकीता रणपिसे, गौरी लोंढे व नुसरत मुजावर या विशेष विद्यार्थीनी कथक सादर करणार आहेत.

 

Related posts: