|Monday, December 9, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » शिवसेनेने साजरी केली काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांची जयंती

शिवसेनेने साजरी केली काँग्रेसच्या वसंतदादा पाटील यांची जयंती 

सांगली / प्रतिनिधी

राज्यातील सत्तेचे फासे उलटे सुलटे पडू लागताच आगळ्या वेगळ्या घटनाही घडू लागल्या आहेत. त्याचाच प्रत्यय सांगलीत आला असून काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांची १०१ वी जयंती चक्क शिवसेनेने साजरी केली आहे.

वसंतदादा पाटील यांच्या हयातीत सांगलीच्या मार्केट यार्ड परिसरात उभारलेल्या पूर्णाकृती पुतळ्यास शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शंभूराज काटकर आणि शहर प्रमुख महेंद्र चंडाळे यांनी पुष्पहार घातला. १३ नोव्हेंबर या दादांच्या जयंती पासून १७ नोव्हेंबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथी पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे देखील काटकर यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वसंत दादा पाटील यांच्याशी मैत्रीचे नाते होते. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दादांच्या समाधीचे दर्शन घेतले होते. राज्यात नवी समीकरणे जुळत असताना दादा हे दोन कुटुंबाच्या मैत्रीचा धागा होते त्यामुळे आम्हीही यावेळी दादांचे स्मरण केले असून येते पाच दिवस दादा आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणार्थ विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी माजी शहर प्रमुख अनिल शेटे, संदीप ताटे, नवनाथ काळे, गणेश घाडगे, ऋषिकेश माने, समीर लालबेग, मंगेश जगताप, मोहसीन मुल्ला, गजानन शिंदे, सुलेमान मुजावर, वसंत काळे, शरद साळुंखे आदी उपस्थित होते.

Related posts: