|Saturday, December 7, 2019
You are here: Home » उद्योग » शेअर बाजार घसरणीसह बंद

शेअर बाजार घसरणीसह बंद 

229 अंकानी सेन्सेक्स नुकसानीत : निफ्टी 73 अंकानी घसरला

वृत्तसंस्था/ मुंबई

मुंबई शेअर बाजार (बीएसई) मंगळवारी गुरुनानक यांच्या जयंतीमुळे बंद होता. एक दिवसाच्या विश्रांतीनंतर बुधवारी शेअर बाजार सुरु झाला, परंतु मायक्रो डाटा संदर्भातील गुंतवणूकदारांमधील चिंता आणि अमेरिका आणि चीन यांच्यातील व्यापार युद्धासंदर्भातील योग्य तडजोडीवरील असंभव वातावरणाचा फटका बुधवारी भारतीय बाजाराला बसल्याचे पहावयास मिळाले आहे.

 सेन्सेक्स दिवसअखेर 229 अंकानी घसरून निर्देशांक 40,116.06 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) निफ्टी दिवसअखेर 73 अंकानी नुकसान नोंदवत निर्देशांक 11,840.45 वर बंद झाल्याची नोंद केली आहे.

दिग्गज कंपन्यांमध्ये येस बँक सर्वाधिक म्हणजे 6.51 टक्क्यांनी नुकसानीत राहिली आहे. तर अन्य कंपन्यांमध्ये स्टेट बँक, ऍक्सिस बँक, वेदान्ता, सन फार्मा, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, आयटीसी, इन्फोसिस  आणि टेक महिंद्रा यांचे समभाग मात्र 3.69 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.  टीसीएस, रिलायन्स इंडस्ट्रीज, मारुती सुझुकी आणि एनटीपीसी यांच्या समभागांनी 3.76 टक्क्यांची तेजी नोंदवली आहे.

व्यापार युद्धाचा प्रभाव

मागील काही दिवसांपासून जगातील दोन महासत्ता असलेल्या अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्ध सुरु आहे. याच्यात तडजोड करण्यावर चर्चा सुरु होती. परंतु त्यात सध्या तरी तडजोड करण्यावर योग्य मार्ग मिळत नसल्याचे पहावयास मिळत आहे.  या घडामोडींचा परिणाम भारतासह जगभरातील शेअर बाजारावर पडत असल्याचे पहावयास मिळत आहे.

महिन्याभरापासून सुरु असलेल्या हाँगकाँगमधील निर्देशनाचा प्रभाव शेअर बाजारांवर नकारात्मक पडला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवरील वातावरण येत्या काही दिवसात निवळल्यास भारतीय शेअर बाजाराचा कल समाधानकारक राहणार असल्याचे अनुमान शेअर बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली आहेत. 

Related posts: