|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भाजप ‘वेट ऍन्ड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार

भाजप ‘वेट ऍन्ड वॉच’च्या भूमिकेत : मुनगंटीवार 

नागपूर / प्रतिनिधी

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली. दोघांमध्ये अर्धा तास बंद द्वार चर्चा झाली. या चर्चेनंतर माध्यमांशी बोलताना मी माझ्या वैयक्तिक कामासाठी आलो होतो. आम्ही सध्या वेट अँण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

सत्तास्थापनेसाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्यात बैठकांचे सत्र सुरू आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली. आज दिवसभर विविध घडामोडी घडत आहेत. सगळय़ा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली. राष्ट्रपती राजवटीचा निर्णय झाल्यापासून भाजपने त्यांच्या परीने हालचाली सुरू केल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर घेतलेली ही भेट महत्त्वाची मानली जात असून अर्धा तास झालेल्या चर्चेचा मात्र तपशील समजू शकला नाही.

Related posts: