|Tuesday, December 10, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » गोलबाग मित्र मंडळ जपतोय सामाजिक सलोखा अन् एकी

गोलबाग मित्र मंडळ जपतोय सामाजिक सलोखा अन् एकी 

प्रतिनिधी/ सातारा

हल्लीची प्लॅटची संस्कृती आहे. शेजारच्या घरात काय सुरु आहे हे समजत नसते.प्रत्येक जण आपल्याच भावविश्वात रंगून जात असतो.मात्र, साताऱयात गोलबागेच्या जवळ भेटणाऱया मित्रांनी सुरु केलेला गोलबाग मित्र मंडळ आज 28 वर्षांनीही सामाजिक कार्यात तेवढाच तत्पर आहे. आज या ग्रुपचे तब्बल दीडशे सदस्य सक्रीय आहेत. सामाजिक कार्य करत असताना एकमेकांच्या सुखदुखात सहभागी होणे, उपक्रम राबवताना एकीची भावना वाढीस निर्माण केली जाते. वय वर्ष 65 पासून ते 25 वर्ष वयाचे तरुणही या ग्रुपमध्ये आहेत. या ग्रुपचा सोशल मीडियामध्येही व्हॉट्स ऍप ग्रुप दि.25 जुन 2014 ला स्थापन झाला आज एक मेसेजवर मित्र मंडळाचे सदस्य हाकेला धावून येतात.

धक्काधक्कीच्या आणि स्पर्धेच्या युगात दोन मित्रही एका विचाराने बरेच दिवस राहू शकत नाहीत. परंतु साताऱयातल्या गोलबाग मित्र मंडळाने याला फाटा दिला आहे. सर्व पक्षाचे आणि सर्व समाजाचे तसेच या मित्र मंडळामध्ये सहभागी आहेत. अगदी बांधकाम व्यवसायिकांपासून नोकरदार ही सहभागी आहेत. या मित्रमंडळाची सुरुवात 28 वर्षापूर्वी गोलबागेच्या जवळ जांभळेच्या आईसक्रीम पार्लरच्या ठिकाणी रात्री काही सातारकर बसायचे. बसल्यानंतर चहा घेताना गप्पा व्हायच्या. तेव्हापासून गोलबाग मित्र मंडळाची सुरुव<ात झाली. या मंडळाकडून सुरुवातील सायकल ट्रीपचे आयोजन सातारा ते गणपतीपुळे, सातारा ते रायगड अशा काढण्यात आल्या. पुढे ही चळवळ बनली. आज या ग्रुपच्या माध्यमातून कास तलाव परिसरात जे अस्वच्छता निर्माण केली जाते. तेथे स्वच्छता मोहिम राबवून तेथे कचराकुंडय़ा ठेवण्यात आल्या आहेत. कुरणेश्वर परिसरातही वृक्षारोपण करण्यात आले. त्या झाडांचे सवंर्धन करण्यात येत आहे. एवढय़ावर कार्य न थांबवता विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली जाते. सर्व सदस्यांच्या सहलींचे आयोजन करण्यात येते. महिलांकरताही खास उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. सामाजिक कार्यक्रमामुळे गोलबाग मित्र मंडळाच्या रुपाने एकीचे आणि सामाजिक सलोख्याचे दर्शन साताऱयात घडत आहे. दरम्यान, ग्रुपमधील सदस्यांचे वाढदिवस त्यांच्या घरी जावून साजरे केले जातात. त्यांच्या आनंदात सहभागी होतात. या ग्रुपमध्ये मधू फल्ले, सतीश ननावरे, प्रशांत थोरात, बंडू सोडमिसे, दत्ता मोरे, भास्कर पवार, विश्वास गोसावी, सुधीर देशमुख,सुबोध माने, दिनेश पवार, सुबोध भिसे, धनंजय कदम, दीपक शिदे, नंदकुमार फडके यांच्यासह सदस्य आहेत.

सामाजिक उपक्रम राबवणारा ग्रुप

25 वर्षापासून ते 65 वर्षांपर्यंतचे सर्व वयोगटातील व्यक्ती या ग्रुपमध्ये समाविष्ट आहेत. हे नुसते एकत्र येण्याचा मित्रांचा ग्रुप नसून या ग्रुपच्या अंतर्गत अनेक सामाजिक उपक्रम राबवण्यात येतात. स्वच्छता मोहिम, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना साहित्य वाटप आदी उपक्रम घेतले जातात. उदाहरण कास तलावाच्या काठावर दहा कचऱयाच्या कुंडय़ा ठेवल्या आहेत. वृक्षारोपण करुन त्या झाडांचे संगोपन करतो. वर्षातून एखादी सहल केली जाते. सहकुटुंब कार्यक्रम केले जातात. मुलांच्या सत्कार केले जातात. दरवर्षी करतो.

Related posts: