|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उद्धव ठाकरे उद्या जिल्हा दौऱयावर

उद्धव ठाकरे उद्या जिल्हा दौऱयावर 

मरगळलेले सेनेचे पदाधिकारी खडबडून जागे,

प्रतिनिधी/ सातारा

सध्या राज्यात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. शेतकऱयांना पावसाने झोपडून काढले आहे. नुकसानीची परिसिमाच नाही. त्याकरता सरकार येणे गरजेचे असताना मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीपायी राज्याचे नेते मंडळी त्यामध्ये व्यस्त आहेत. त्यातही अचानकपणे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱयांचा पाहणी दौरा काढला आहे. शुक्रवारी सातारा जिह्यात येत आहेत. शेतकरी आपल्या व्यथा त्यांच्याजवळ मांडणार आहेत. दरम्यान, त्यांच्या जाहीर झालेल्या दौऱयामुळे मरगळलेले पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत.

  सातारा जिह्यातील शिवसेना वाढण्याऐवजी असलेल्या पदाधिकाऱयांनी व संघटनात्मक ज्यांच्यावर जबाबदारी दिली आहे त्यांनीच गळचेपी केल्याचे आरोप अनेकदा झाले आहेत. अगदी साताऱयासारख्या शहरातील पदाधिकाऱयांना व कार्यकर्त्यांना पाठबळ दिले गेले नव्हते. त्यामुळे आज शहरात शिवसेनेचे अस्तित्व नगण्य बनले आहे. विधानसभा निवडणुकीवेळी मंत्री दिवाकर रावते हे साताऱयात आले होते. त्यावेळी आयोजित बैठकीत कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱयांना शिस्तीच्या नावाखाली जे खडेबोल सुनावत होते. त्याचाच प्रत्यय मतदानामध्ये पहायला मिळाला. निष्ठा असूनही मदतान केले नाही. सेनेमध्ये कार्यकर्ते हे कोणत्या लालसेने येत नसतात हे अनेक निष्ठावान बोलून दाखवतात. परंतु त्यांच्यावर अशा पद्धतीचे हॅमरिंग होते की पक्षाचे काम करताना जे पाठबळ मिळायला हवे असते ते मिळत नाही त्यामुळे सातारा जिह्यात सेना वाढण्याऐवजी उतरती कळा झाली आहे. कोरेगाव मतदार संघातून सेनेचे आमदार महेश शिंदे हे निवडून आले आहेत. मात्र, ते महायुतीचे उमेदवार होते. अगोदर त्यांचे भाजपाकडून कार्य सुरु होते. तसेच त्यांच्या निवडीकरता दोन्ही राजांनीही लक्ष घातले होते. त्यामुळे ते जरी सेनेचे आमदार असले तरीही त्यांचा मतदार हा महायुतीचा मतदार आहे हे निश्चित. तसेच माण मतदार संघात सेनेच्या आमदारकीला शेखर गोरे यांना उमेदवारी दिली खरी. परंतु त्यांनी सेनेचा बाण घरोघरी पोहचवला खरा परंतु तेथे जे निष्ठावान म्हणणारे पदाधिकारी सक्रीय नव्हते हे त्यांना पडलेल्या मतदानावरुन दिसून येते. आता तर राज्यात महायुतीला मतदान मतदारांनी केले अन् सेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी घरोबा करत सत्तास्थापनेचा प्रयत्न केला. त्यामुळे नाराजीचा सुर शिवसैनिकांमध्येच आहे. अगोदरच पावसाने शेतकऱयांचे बेहाल झाले  आहे.

  सातारा जिह्यात माण तालुक्यात बिकट परिस्थिती झाली आहे. सातारा जिह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱयांच्या शेती आणि फळबागांची पहाणीसाठी उद्धव ठाकरे हे दि. 15 रोजी येत आहेत. दुपारी 2 वाजता सांगली मार्गे मायणी मार्गे सातारा जिह्यात आगमन होणार आहे. ते कातरखटाव, वडूज, पुसेगाव, ताथवडे घाट, फलटण, तरडगाव तर संध्याकाळी लोणंदमार्गे पुण्यासाठी रवाना होणार आहेत. या दौऱयात शेतकरी आपल्या व्यथा त्यांच्याजवळ मांडतील परंतु सध्या राज्यात सरकारच स्थापन नसल्याने ते तरी नेमके काय सांगणार आहेत याचीच उत्सुकता शेतकऱयांना लागून राहिली आहे. दरम्यान, पदाधिकारी व कार्यकर्तेही रिचार्ज झाले आहेत.

Related posts: