|Thursday, December 12, 2019
You are here: Home » Top News » शबरीमाला मंदिर खटला मोठय़ा खंडपीठाकडे

शबरीमाला मंदिर खटला मोठय़ा खंडपीठाकडे 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

केरळमधील शबरीमाला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आणखी लांबला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण आता आणखी मोठय़ा खंडपीठाकडे म्हणजेच सात न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडे सौपवले आहे. पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठात दोन न्यायमूर्तींच्या असहमतीनंतर हे प्रकरण मोठय़ा खंडपीठाकडे पाठवण्याचा निर्णय 3-2 ने घेण्यात आला. 

सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी म्हटले की, महिलांना प्रार्थनास्थळी मिळणारा प्रवेश हा फक्त मंदिरापुरतं मर्यादित नाही. मशिदींमध्ये तसेच पारशींच्या प्रार्थनास्थळाचा विचार करणे गरजेचे आहे.

केरळमधील शबरीमाला मंदिरात महिलांच्या प्रवेशावरील बंदी हटवून सुप्रीम कोर्टाने महिलांच्या प्रवेशास परवानगी दिली होती. या निर्णयाला अनेक धर्मिक संघटनांनी विरोध दर्शविला आणि सुप्रीम कोर्टात या निर्णयाला परंपरेचे उल्लंघन म्हटले होते. 

 

Related posts: