|Friday, December 13, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » उदयनराजेंनी केली कराडच्या कोल्हापूर नाक्यावर पाहणी

उदयनराजेंनी केली कराडच्या कोल्हापूर नाक्यावर पाहणी 

प्रतिनिधी / कराड

माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी कराड येथील कोल्हापूर नाक्यावरील अपघातप्रवण क्षेत्राची पाहणी केली. गुरुवारी महामार्ग विभागाच्या अधिकार्‍यांना आठवडयात प्रस्ताव सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

कराड नगरपरिषदेतील जनशक्ती आघाडीचे नेते राजेंद्रसिंह यादव, बांधकाम सभापती राजेंद्रसिंह यादव, नियोजन सभापती विजय वाटेगावकर, नगरसेवक बाळासाहेब यादव, सुप्रिया खराडे, अर्चना ढेकळे, किरण पाटील, सुनील काटकर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

कोल्हापूर नाक्यावर पुण्याला जाणार्‍या लेनवर उड्डाण पूल नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे राजेंद्रसिंह यादव यांच्या विनंतीवरुन उदयनराजेंनी कोल्हापूर नाक्यावर पाहणी केली. प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना केल्या. तसेच नवा पूल होईपर्यत आहे त्या पुलावरुन वाहतूक वळवण्याची सूचना केली.

Related posts: