|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » भारतीय वाहन क्षेत्रावर चीनची करडी नजर

भारतीय वाहन क्षेत्रावर चीनची करडी नजर 

नवी दिल्ली :

भारतातील वाहन कंपन्या आर्थिक मंदीच्या प्रभावातून जात आहेत. यामुळे उत्पादीत वाहनांवर मोठय़ा प्रमाणात डिस्काऊंट देत असून याचा फायदा घेण्याच्या तयारीत चीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय बाजारपेठेवर चीनच्या एक दोन नव्हे तर तब्बल सात कंपन्यांचा डोळा आहे. यापैकी एक कंपनी एमजी मोटर्सने अगोदरच प्रवेश केला असून, टाटा, मारुतीसारख्या कंपन्यांना दमछाक आणली आहे.

भारताला सध्या परदेशी कंपन्यांकडून गुंतवणुकीची गरज असली तरी एकीकडे  मारुती, टाटा, महिंद्रासह अन्य भारतीय कंपन्यांना मोठे आव्हान पुढे येत आहे. एमजी हेक्टर वगळल्यास चीनच्या कंपन्या भारतात प्रवेश करण्यासाठी उत्सूक आहेत. धक्कादायक म्हणजे भारतातील काही कंपन्याच चीनच्या कंपन्यांना भारतात येण्यासाठी मदत करत आहेत. त्यामुळे आगामी तीन ते पाच वर्षांत या कंपन्या भारतात पाच अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची शक्यता आहे.

भारतीय कंपन्यांकडूनच सहकार्य

टाटा मोटर्सच्या जेएलआरमध्ये गिले कंपनी हिस्सेदारी खरेदी करण्याच्या तयारीत आहे. राष्ट्रीय हैवी डय़ूटी ट्रक ग्रुप कंपनीने मुंबईच्या आयशर कंपनीसोबत ट्रक बनविण्याचा करार केला आहे. ही कंपनी सिनोट्रक या नावाने ट्रक बनविते. बेक्यू फोटोन कंपनीने उत्तर भारतातील पीएमएलसोबत करार केला आहे. फोटोनने पुण्यातील चाकणमध्ये जमीन खरेदी केली आहे.

 

Related posts: