|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » ठाकरे दौऱ्यात विश्वजीत कदम सक्रिय, जिल्हा परिषदेचे समीकरण बदलणार?

ठाकरे दौऱ्यात विश्वजीत कदम सक्रिय, जिल्हा परिषदेचे समीकरण बदलणार? 

सुनील सरोदे / वांगी वार्ताहर

शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या कडेगांव आणि विटा दौऱ्यात काँग्रेसचे प्रदेश कार्याध्यक्ष आमदार डॉ. विश्वजीत कदम यांचा सक्रिय सहभाग सांगली जिल्हा परिषदेत सत्तेचे समीकरण बदलण्यासाठी कारणीभूत ठरणार आहे.शुक्रवारी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांशी ठाकरे यांनी साधला. यावेळी नेवरी ग्रामपंचायत येथे ठाकरे यांचे आ. विश्वजीत कदम, ज्येष्ठ नेते आ. मोहनराव दादा कदम यांच्यासह कार्यकर्त्यांनी जोरदार स्वागत केले. ठाकरे यांच्या दौऱयादरम्यान आ. डॉ.कदम ठाकरे पोहोचले त्या प्रत्येक ठिकाणी सोबत होते. तेथील प्रत्येक शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती त्यांनी ठाकरे यांना दिली.

राज्यात होऊ घातलेल्या महाशिव आघाडीसाठी देखील आ. डॉ. कदम हे आग्रही होते. त्यामुळे ठाकरे यांनीही या युवक नेत्यांच्या सक्रियतेला प्रतिसाद दिल्याचे दौऱ्यात जाणवत होते.शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार लवकरच सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे याचा परिणाम सांगली जिल्हा परिषदेत सत्तांतर होण्यात देखील होऊ शकतो. त्यामुळे ठाकरे आणि कदम यांच्यातील जवळीक जिल्ह्यात आघाडीला उपयुक्त ठरणार असून त्यादृष्टीने कदम यांनी पाऊले उचलल्याचे बोलले जात आहे.

Related posts: