|Monday, December 9, 2019
You are here: Home » उद्योग » यूनियन बँकेकडून ‘यू मोबाईल’ सेवा

यूनियन बँकेकडून ‘यू मोबाईल’ सेवा 

नवी दिल्ली

 आजच्या डिजिटल युगात लोकांनी घरात पैसे ठेवणे बंद असून, रोकडसाठी एटीएमकडे रांग लावावी लागते. त्यातच कधी एटीएममधील पैसे संपल्यामुळे होणाऱया मनस्तापामुळे अनेकांना एटीएमच्या खेटा मारायला लागतात. या गैरसोयीवर मात करण्यासाठी युनियन बँकेने आपल्या ग्राहकांसाठी यू मोबाईल  ऍप सुरू केले आहे. यामुळे ग्राहकांना एटीएममध्ये रोकड आहे की नाही हे कळणार आहे. यासाठी बँकेने लाईव्ह सर्व्हेची व्यवस्था केली आहे. एटीएमवर ग्रीन मार्क दिसेल तिथे पैसे असतील तर रिक्त असलेल्या एटीएमच्या ठिकाणी लाल खूण दिसणार आहे. युनियन बँकेचे देशभरात सुमारे 7000 एटीएम आहेत. युनियन बँकेच्या या अ?Ÿपचे वैशिष्टय़ म्हणजे ते 3 वेगवेगळय़ा अंतरावर (0-3 किमी, 3-5 किमी, 5-10 किमी) एटीएम चिन्हांकित करू शकते. युनियन बँक ऑफ इंडियाचे सीएमडी राजकिरण राय यांनी याबाबतची माहिती दिली आहे. या मोबाईल अ?Ÿपची लिंकही बँकेच्या वेबसाईटवर देण्यात आली आहे.

Related posts: