|Saturday, December 7, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज्यात आमचेच सरकार

राज्यात आमचेच सरकार 

पाच वर्षे कारभार करेल

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केला विश्वास

नागपूर / प्रतिनिधी

राज्यात नवे सरकार स्थापन करण्यासा”ाr राज्यपालांनी आम्हाला सहा महिन्यांची मुदत दिली आहे. त्यामुळे सरकार कधी स्थापन होईल हे आज सांगणे क”ाrण आहे. मात्र, लवकरच सरकार स्थापन होईल आणि ते पुढील पाच वर्षे सुरळीत कारभार चालवेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी नागपुरात माध्यमांशी बोलताना केला.

नागपूर श्रमिक पत्रकार संघाच्या पत्रकारांशी वार्तालाप कार्यक्रमात बोलताना पवार म्हणाले की, किमान समान कार्यक्रम बनवण्याबाबत आमची काँग्रेस आणि शिवसेनेशी चर्चा सुरळीत सुरू आहे. लवकरच हा कार्यक्रम निश्चित होईल आणि आम्ही सरकार स्थापन करू, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नवे सरकार स्थापन करताना मुख्यमंत्री कोणाचा असेल याबाबत विचारले असता ज्यांचा मुख्यमंत्रिपदासा”ाr आग्रह आहे; त्यांच्या मागणीचा निश्चित विचार होईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. आमची महाराष्ट्रात स्थिर सरकार यावे ही इच्छा असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करीत आहोत. मुख्यमंत्री कोणाचा हा प्रश्न चर्चेतून सोडवू असे ते म्हणाले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सेक्युलर पक्ष असल्यामुळे शिवसेनेशी जुळून कसे घेणार ? असे विचारले असता याबाबत समान किमान कार्यक्रम “रवताना चर्चा होणार असल्याचे पवार यांनी सांगितले. आम्ही दोन्ही पक्ष सेक्युलॅरिझम मानणारे आणि आचरणात आणणारे आहोत. अशावेळी शिवसेनेचे कडवे हिंदुत्व आडवे येणार नाही याची पूर्ण काळजी घेतली जाईल, असे पवार यांनी स्पष्ट केले. 

राज्यात प्रथमच महिला मुख्यमंत्री देणार काय ? असे विचारले असता आजतरी हा विषय आमच्या अजेंडय़ावर नाही असे सांगून पवार म्हणाले की, याविषयी योग्यवेळी योग्य निर्णय घेतला जाईल. देवेंद्र फडणवीस यांच्या ‘मी पुन्हा येईन’ या वक्तव्याचा समाचार घेताना पवार म्हणाले की, ‘फडणवीसांना मी गेल्या काही वर्षांपासून ओळखतो मात्र त्यांचा ज्योतिषाचा अभ्यास असल्याची मला कल्पना नव्हती.’

राज्यात अवकाळी पावसामुळे शेतकऱयांचे प्रचंड नुकसान झाले असून या मुद्यावर पेंद्र सरकारशी आम्ही चर्चा करू. शेतकऱयांना तत्काळ मदत मिळावी यासा”ाr

आग्रह धरणार असल्याचे पवार यांनी यावेळी सांगितले. शेतकऱयांची महत्त्वाची पिके हातून गेली असून त्यांना झालेल्या नुकसानाची भरपाई मिळणे बँक कर्जातून कर्जमाफी मिळणे आणि पुढचा गाडा चालवण्यासा”ाr अनुदान मिळणे गरजेचे असून त्यादृष्टीने आम्ही प्रयत्न करू आणि सोमवारपासून सुरू होणाऱया संसद अधिवेशनातही आग्रह धरू, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱयांना पीक विमा भरपाई तत्काळ मिळावी यासा”ाrही आम्ही पेंद्राशी बोलू आणि प्रश्न कसे निकालात काढता येतील हा प्रयत्न करू, असे त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल देशमुख, प्रकाश गजभिये, काँग्रेसचे आशिष देशमुख उपस्थित होते.

Related posts: