|Friday, February 28, 2020
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

रवि. 17 ते 23 नोव्हेंबर 2019

मेष

या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील समस्या कमी करण्याची संधी मिळेल. सर्व मनाप्रमाणे, पटापट होईल, असे समजू नका. मार्ग मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात धावपळ होईल. तुमच्या यशाचे कौतुक कमी होईल. वाट पहा, परिस्थिती सुधारेल. घरातील कामे होतील. तणाव कमी होईल. कला, क्रीडा क्षेत्रात ओळखी होतील. प्रसिद्धीसाठी वेळ लागेल. नोकरी टिकवा.


वृषभ

धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. गोड बोलून तुम्ही तुमचे काम करून घ्या. धंद्यात मेहनत घ्यावी लागेल. नोकरीत वरिष्ठाची मदत मिळेल. राजकीय- सामाजिक कार्यात प्रति÷ा सांभाळता येईल. जवळचे लोक कारस्थाने करण्याचा प्रयत्न करतील. खाण्याची काळजी घ्या. संसारात तणाव होऊ शकतो. व्यसनाने नुकसान होईल. कला, क्रीडा क्षेत्रात नावलौकिक मिळेल.


मिथुन

या सप्ताहात धनु राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु  त्रिकोण योग होत आहे. धंद्यातील समस्या सोडवण्याचा प्रयत्न करा. अरेरावी कुठेही करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला संयमाने वागावे लागेल. तुमची प्रतिष्ठा बिघडवण्याचा प्रयत्न केला जाईल. जिद्द ठेवा. नोकरीत वरिष्ठाची मर्जी राखा. कोर्टकेसमध्ये सावध रहा. कला, क्रीडा क्षेत्रात परिश्रम घ्या. घरातील वातावरण निवळेल.


कर्क

धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सप्ताहाच्या सुरुवातीला काम करून घ्या. रविवारी रागावर ताबा ठेवा. वाहनाचा वेग कमी ठेवा. राजकीय, सामाजिक कार्यात पदाधिकार मिळेल. क्षुल्लक क्यक्ती समजून कुणालाही दुखवू नका. संसारात संयमाने वागा. नोकरीत वरि÷ खूष होतील. कोर्टकेस संपवा. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. कायदा पाळा.


सिंह

धनु राशीत शुक्र प्रवेश, चंद्र बुध लाभयोग होत आहे. धंद्यात, संसारात सप्ताहाच्या सुरुवातीला अडचण येईल. घरासंबंधी समस्या येईल. प्रश्न संयमाने सोडवा. अरेरावी  करू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला कमी लेखण्याचा प्रयत्न केला जाईल. खंबीर रहा. नोकरीत वरि÷ांचा दबाव राहील. कोर्टकेसमध्ये आशा वाढतील. नम्र रहा.


कन्या

धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोणयोग होत आहे. सप्ताहाच्या मध्यावर अडचण येईल. धंद्यात  टिकून राहता येईल. डोळय़ांची काळजी घ्या. थकबाकी वसूल करा. राजकीय- सामाजिक कार्यात प्रतिष्ठा मिळेल. तुमचा मुद्दा नम्रतेने पटवून द्या. घरात जबाबदारी वाढेल. दूरच्या प्रवासाचे वेळ फुकट घालवू नका. कोर्टकेस संपवा.


तुला

धनु राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, गुरु त्रिकोण योग होत आहे. धंद्यात जम बसेल. मागील येणे वसूल करा. कर्जाचे काम होईल. वेळ सत्कारणी लावा. ग्रहांची साथ आहे. प्रयत्न करा. राजकीय, सामाजिक कार्यात प्रति÷ा, मान मिळेल. पद मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रसिद्धी, पैसा मिळेल. नोकरीचा प्रयत्न करा. कोर्टकेस संपवा. सप्ताहाच्या शेवटी राग आवरा.


वृश्चिक

धनु राशीत शुक्र प्रवेश, साडेसाती सुरू आहे. 25 जाने  2020 रोजी साडेसाती संपणार आहे. धंद्यात प्रयत्न जास्त करावे लागतील. तुमचे बोलणे फार महत्त्वाचे ठरेल. कडवट बोलू नका. राजकीय, सामाजिक कार्यात तुम्हाला यश मिळेल. वचक राहील. रागावर ताबा ठेवा. वाहन जपून चालवा. दूरच्या  प्रवासाचा बेत ठरवाल. संतती प्राप्तीचा प्रयत्न करा. स्पर्धा जिंकाल.


धनु

तुमच्याच राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात वाढ करण्याची संधी मिळेल. उतावळेपणा कुठेही करू नका. खाण्या- पिण्याची काळजी घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात आरोप येईल. टिका होईल. घरात चिंताजनक वातावरण राहील. वाटाघाटीचा प्रश्न सोडवणे सोपे नाही. प्रयत्न करा. कोर्टकेस कठीण आहे. कला, क्रीडा स्पर्धेत अन्याय होऊ शकतो.


मकर

धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य, चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात काम मिळेल. हिशोब नीट करा. भावनेच्या आहारी न जाता कोणताही निर्णय घ्या. राजकीय, सामाजिक कार्यात प्रतिष्ठा राहील. बुधवार, गुरुवार ताणतणाव होऊ शकतो. घरगुती कामे होतील. जवळचे लोक मदत करतील. कला, क्रीडा क्षेत्रात कौतुक होईल. प्रसिद्धी मिळेल. कोर्टकेस संपवा.


कुंभ

धनु राशीत शुक्र प्रवेश, चंद्र, बुध लाभयोग होत आहे. धंद्यात काम मिळेल. धावपळ होईल. कटकटीतून मार्ग शोधावा लागेल. कायदा मोडू नका. निष्कारण तुमचा वाद होऊ शकतो. राजकीय, सामाजिक कार्यात प्रभाव पडेल. मान-प्रतिष्ठा मिळेल. अधिकार मिळेल. घरगुती वातावरण आनंदी राहील. अविवाहितांना लग्नासाठी प्रयत्न करता येईल. कला, क्रीडा क्षेत्रात प्रगती होईल. नोकरी मिळेल.


मीन

धनु राशीत शुक्र प्रवेश, सूर्य,चंद्र त्रिकोण योग होत आहे. धंद्यात सुधारणा होईल. रागावर ताबा ठेवल्यास सर्व सुरळीत होईल. 20-21 वाहन जपून चालवा. मागील येणे वसूल करा. राजकीय- सामाजिक कार्यात अधिकार मिळेल. कुणालाही कमी समजू नका. दूरच्या प्रवासाचा बेत ठरवाल. अडचणीत आलेले काम करून घ्या. कोर्टकेस जिंकाल. कला-क्रीडा क्षेत्रात चमकाल.

Related posts: