|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पोलीस वसाहतीच्या रस्त्यावरून जीवघेणी वाहतूक

पोलीस वसाहतीच्या रस्त्यावरून जीवघेणी वाहतूक 

अरूंद रस्त्यावर वाहनांची कसरत साईट पट्टा खचल्याने अपघाताना निमंत्रण

प्रतिनिधी/ सातारा

शहरातील पोलीस वसाहतीमधून अरूंद रस्त्याने वाहतूक सुरू आहे. तसेच रस्त्याचे साईड पट्टे खचल्याने वाहनधारकांची कसरत सुरू आहे. गेड सेपरेटरमुळे कर्मवीर पथावरून राजपथावर जाण्यासाठी या मार्गाने वाहतूक होत आहे. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने वाहनधरकांची जीवघेणी वाहतूक सुरू आहे.

  ग्रेड सेपरेटरचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे शहरातील उपरस्त्यांनी वाहतूक होत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कर्मवीरपथावर वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी एकेरी वाहतूक सुरू आहे. यामुळे कर्मवीरपथावरून राजपथावर जाण्यासाठी पोलीस वसाहतीतून वाहतूक सूरू आहे. या पोलीस वसाहतीतील रस्ता अरूंद आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुचे साईड पट्टे खचले आहेत. या मार्गाने दुचाकी, चारचाकी आणि माल वाहतूक करणारी वाहने सातत्याने जात असतात. यावेळी वाहनांचे चाक घसरून अपघात होईल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर दुचाकी वाहने कोंडीत सापडत असतात. दुतर्फा वाहतूक सुरू असल्याने चारचाकी वाहनांची कसरत सुरू आहे.

 दरम्यान रस्त्याच्या दोन्ही बाजुला डांबरीकरण करण्यात यावे तसेच रस्त्यांच्या रूंदी वाढविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहेत. राजपथावर नगरपालिका असून रस्त्याने होणारी कसरत पालिका अधिकारी नेहमी बघत असतात. दिड वर्षापासून या मार्गाने वाहतूक होत असताना पालिकेकडून कोणत्याच उपाय योजना केल्या नाहीत. यामुळे ढिम्म पालिका प्रशासनाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर येवून पडला आहे. याचा नाहक त्रास वाहनधारकांना सोसावा लागत आहे.

Related posts: