|Saturday, January 25, 2020
You are here: Home » leadingnews » हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज सातवा स्मृतीदिन

हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आज सातवा स्मृतीदिन 

 ऑनलाईन टीम / मुंबई :

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतिदिन आहे. बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी आज लाखो शिवसैनिक शिवाजी पार्क येथील शिवतीर्थावर दाखल झाले आहेत.

राज्यातील राजकीय नेत्यांनीही आज शिवतीर्थावर हजेरी लावून बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे. युतीची सत्ता असताना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर भाजप नेते या ठिकाणी जाऊन आदरांजली वाहत होते. मात्र, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

सत्तावाटपावरुन शिवसेना व भाजप यांच्यातील वाद टोकाला पोहोचेला असल्याने या स्मृतिस्थळाला भाजप नेते, आमदार व पदाधिकारी भेट देतील का, याबाबत राजकीय क्षेत्रात संभ्रम आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत, अरविंद सावंत, गजानन कीर्तिकर यांच्यासह शिवसेनेच्या नेत्यांनी बाळासाहेबांना आदरांजली वाहिली आहे.

तर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ यांनीही शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर जाऊन त्यांना अभिवादन केले आहे.

 

Related posts: