|Thursday, December 5, 2019
You are here: Home » Top News » मार्च अखेर ‘एअर इंडिया’,‘भारत पट्रोलियम’ची विक्री : सितारामन

मार्च अखेर ‘एअर इंडिया’,‘भारत पट्रोलियम’ची विक्री : सितारामन 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

‘एअर इंडिया’ आणि ‘भारत पट्रोलियम’ या दोन कंपन्यांच्या विक्रीची प्रकिया मार्च अखेर पूर्ण होईल, असे अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.

सितारामन म्हणाल्या, चालू आर्थिक वर्षात करसंकलनात झालेली घट पाहून निर्गुंतवणूक आणि धोरणात्मक विक्रीच्या माध्यमातून महसूल गोळा करण्याचा सरकारचा विचार आहे. त्यामुळे ‘एअर इंडिया’ आणि ‘भारत पट्रोलियम’ या दोन्ही कंपन्यांच्या विक्रीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण व्हावी, असे सरकारला वाटत आहे. ही प्रक्रिया सुरु होण्यापूर्वीच गुंतवणूकदारांमध्ये उत्साह आहे. म्हणून मार्च अखेरपर्यंत या दोन्ही कंपन्यांची विक्री करण्याचा विचार करत असल्याचे निर्मला सितारमण यांनी म्हटले आहे.

देशाला आर्थिक मंदीतून बाहेर काढण्यासाठी सरकार विविध उपययोजना राबवत आहे. उद्योजकांनीही गुंतवणूकीची तयारी दर्शविली आहे, असेही त्या म्हणाल्या.

 

 

Related posts: