ऑस्ट्रेलियातील मुख्यमंत्र्यांचेही हस्ताक्षर पावसकरांच्या संग्रहात

कणकवली:
तळेरे येथील हस्ताक्षरसंग्राहक निकेत पावसकर यांच्या संग्रहात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे प्रिमियर (मुख्यमंत्री) मार्क मॅकगोवन यांचे संदेशपत्र दाखल झाले आहे. मुंबई विद्यापीठ येथे एका शैक्षणिक कार्यक्रमानिमित्त दाखल झालेल्या मॅकगोवन यांची पावसकर यांनी भेट घेतली. ‘वेस्टर्न ऑस्ट्रेलिया व मुंबई दरम्यानचे सदस्यत्व बळकट आहे’ असा संदेश मॅकगोवन यांनी लिहिला आहे.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया येथील ओशिएक इन्स्टिटय़ुटचं संचालक पीटर वेथ, कमिशनर पीटर लाल्डवीन, डेप्युटी डायरेक्टर जेनिफर मॅथ्यू, काऊन्सलर जनरल टोनी हुबर, डायरेक्टर एज्युकेशन साऊथ आशियाचे जमाल कुरैशी, प्रभारी कुलगुरू प्रा. रवींद्र कुलकर्णी, कुलसचिव डॉ. अजय देशमुख, शैक्षणिक समन्वयक प्रा. विनायक दळवी आदी उपस्थित होते. सध्या पावसकर यांच्या संग्रहात देश-विदेशातील 1200 पेक्षा जास्त व्यक्तींची हस्ताक्षरे व संदेश आहेत.