|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » घट्ट मैत्रीची गोष्ट सांगणारा ‘दोस्ती जिंदाबाद’

घट्ट मैत्रीची गोष्ट सांगणारा ‘दोस्ती जिंदाबाद’ 

बॉलीवूड दिग्दर्शक पार्थो घोष यांचा आगामी चित्रपट ‘दोस्ती जिंदाबाद’ येत्या 22 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. याआधी हा चित्रपट 8 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार होता. काही तांत्रिक कारणांमुळे चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले. ‘दोस्ती जिंदाबाद’ हा विनोदी चित्रपट असून, मैत्रीची नवी व्याख्या या चित्रपटाद्वारे रुपेरी पडद्यावर दिसेल.

चित्रपटाचे निर्माते आणि लेखक आशिष महेश्वरी यांनी सांगितले की, हा तरुणांना पेंद्रस्थानी ठेवून तयार केलेला चित्रपट असून, आजच्या युवापिढीला तो आपलासा वाटेल. 100 डेज, कोहरा, अग्निसाक्षी, गुलाम-ए-मुस्तफा, युगपुरुष यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक पार्थो घोष यांनी या चित्रपटाची गोष्ट ऐकून लगेचच चित्रपटाला होकार दिला. चित्रपटाची कथा आशिष महेश्वरी याची असून, लेखन सोहेल अख्तर यांचे आहे. चित्रपटात देव शर्मा, साक्षी मैगो, अब्बास खान, सबीहा अत्तरवाला, राहुल चौधरी, अपूर्वा नैन, शक्ति कपूर, मोहन जोशी, किरण कुमार, राजीव निगम, एहसान खान, पप्पू पॉलिस्टर आणि श्रद्धा शर्मा मुख्य भूमिकेत आहेत. संगीत सचिन आंनद आणि बिस्वजीत भट्टाचार्य यांचे आहे. नफत्य दिग्दर्शन जोजो खान आणि छायाचित्रण अक्रम खान यांचे आहे.

Related posts: