|Friday, December 6, 2019
You are here: Home » Agriculture » वाढीव मदतीसाठी शेट्टी राज्यपालांना भेटणार

वाढीव मदतीसाठी शेट्टी राज्यपालांना भेटणार 

प्रतिनिधी / सांगली

अतिवृष्टी, अवकाळीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱयांना राज्यपालांनी जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. त्यांनी फळबाग शेतकऱयांना हेक्टरी एक लाख तर खरीप पिकांसाठी किमान 50 हजार रुपये इतकी मदत द्यावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली आहे. दरम्यान याबाबत आठवडाभरात राज्यपालांची ते शेतकऱयांच्या शिष्टमंडळासह भेट घेणार आहेत, अशी माहिती महेश खराडे यांनी दिली आहे.

शेतकऱयांना दिलासा देण्यासाठी त्यांना तात्काळ मदत मिळावी यासाठी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार होता. मात्र काही कारणास्तव हा मोर्चा रद्द करण्यात आला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. त्यामुळे मोर्चा कोणाच्या विरोधात काढायचा असा प्रश्न असल्याचे सांगत खराडे म्हणाले, फळबाग शेतकऱयांना हेक्टरी एक लाख तर खरीप पिकांसाठी किमान 50 हजार रुपये इतकी मदत मिळावी अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी आहे.

याऊलट राज्यपालांनी खरीप पिकांसाठी हेक्टरी आठ तर फळबागांसाठी 18 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. ही मदत अत्यंत तुटपुंजी आहे. याचा माजी खासदार शेट्टी यांनी तीव्र शब्दात निषेध केल्याचे सांगत खराडे म्हणाले, शेतकऱयांना संघटनेच्या मागणीप्रमाणे मदत मिळावी यासाठी राजू शेट्टी आठवडाभरात शेतकऱयांच्या शिष्टमंडळासह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटणार आहेत. त्यानंतरही राज्यपालांनी संघटनेच्या मागणीकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे, असेही खराडे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

Related posts: