|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » व्हेरेव्हला हरवून ऑस्ट्रीयाचा थिएम अंतिम फेरीत

व्हेरेव्हला हरवून ऑस्ट्रीयाचा थिएम अंतिम फेरीत 

वृत्तसंस्था/ लंडन

2019 च्या टेनिस हंगामातील एटीपी टूरवरील येथे सुरू असलेल्या पुरूषांच्या आंतरराष्ट्रीय अंतिम स्पर्धेत ऑस्ट्रीयाच्या डॉम्निक थिएमने जर्मनीच्या विद्यमान विजेत्या ऍलेक्झांडर व्हेरेव्हला पराभवाचा धक्का देत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. आता थिएम आणि ग्रासचा सिटसिपेस यांच्यात एकेरीच्या जेतेपदासाठी लढत होईल.

शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रीयाच्या पाचव्या मानांकित थिएमने जर्मनीच्या व्हेरेव्हचा 7-5, 6-3 असा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. या स्पर्धेत प्रथमच सहभागी होणाऱया ग्रेसच्या सिटसिपेसने स्वीसच्या अनुभवी रॉजर फेडररचे आव्हान 6-3, 6-4 असे संपुष्टात आणत अंतिम फेरी गाठली आहे. गेल्यावर्षी या स्पर्धेत जर्मनीच्या व्हेरेव्हने सर्बियाच्या जोकोव्हिकचा अंतिम सामन्यात पराभव करून  विजेतेपद मिळविले होते पण यावर्षी त्याला उपांत्य सामन्यात थिएमकडून हार पत्करावी लागली. फेडररपेक्षा 17 वर्षांनी लहान असलेल्या ग्रीस सिटसिपेसची कामगिरी आतापर्यंत दर्जेदार झाली आहे. 38 वर्षीय फेडररने आतापर्यंत सहावेळा ही स्पर्धा जिंकली आहे. सिटसिपेसने आपल्या अचूक रॅलीज गेमवर फेडररला नमविले.

Related posts: