|Sunday, December 15, 2019
You are here: Home » क्रिडा » झेकचा बर्डीच टेनिसमधून निवृत्त

झेकचा बर्डीच टेनिसमधून निवृत्त 

वृत्तसंस्था/ लंडन

झेक प्रजासत्ताकच्या टेनिसपटू टॉमस बर्डीचने शनिवारी येथे आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपला निवृत्तीची घोषणा केली,. बर्डीचने आपल्या टेनिस कारकीर्दीत एटीपीच्या मानांकनात चौथे स्थान तसेच विंल्बडन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते.

34 वर्षीय बर्डीचने आपल्या 17 वर्षांच्या टेनिस कारकीर्दीत एटीपी टूरवरील 13 स्पर्धा जिंकल्या आहेत. 2010 आणि 2016 साली या कालावधीत बर्डीचने एटीपीच्या मानांकनात पहिल्या 10 खेळाडूंमध्ये स्थान राखले होते. गेल्या ऑगस्टमध्ये अमेरिकन ग्रॅण्ड स्लॅम स्पर्धेत बर्डीचला पहिल्याच फेरीत हार पत्करावी लागली होती. त्यानंतर त्याने एकाही स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला नाही. 2012 आणि 2013 साली डेव्हिस चषक जिंकणाऱया झेक संघात बर्डीचचा समावेश होता.

Related posts: