|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाच्या पॅटीनसनवर निर्बंध

ऑस्ट्रेलियाच्या पॅटीनसनवर निर्बंध 

वृत्तसंस्था/ सिडनी

ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जेम्स पॅटीनसनने एका खेळाडूला वैयक्तिक शिवीगाळ केल्याने त्याच्यावर क्रिकेट ऑस्ट्रेलियाने निर्बंध घातले आहे. या निर्णयामुळे पाकविरूद्ध होणाऱया पहिल्या कसोटीत तो खेळू शकणार नाही.

गेल्या आठवडय़ात शेफिल्ड शिल्ड क्रिकेट स्पर्धेतील व्हिक्टोरिया आणि क्विन्सलँड यांच्यातील सामन्यावेळी ही घटना घडली. क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या शिस्तपालन नियमाचा भंग केल्याने पॅटीनसनवर ही कारवाई करण्यात आली. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत पॅटीनसनकडून तीनवेळा शिस्तपालन नियमाचा भंग झाला होता. पॅटीनसनने क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या शिस्तपालन समितीसमोर सुनावणीवेळी आपला गुन्हा मान्य केला.

Related posts: