|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय महिलांना 5 सुवर्णपदके

भारतीय महिलांना 5 सुवर्णपदके 

आशियाई युवा मुष्टियुद्ध स्पर्धा : भारताला एकूण 12 पदके

वृत्तसंस्था/ उलानबातार, मंगोलिया

आशियाई युवा मुष्टियुद्ध स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी रविवारी पदकांचा पाऊस पाडला असून अंतिम फेरी गाठलेल्या सर्व भारतीय महिलांनी जेतेपद मिळविले सुवर्ण तर दोन पुरुष मुष्टियोद्धय़ांनी रौप्यपदके पटकावली.

नाओरेम चानू (51 किलो गट), विन्का (64 किलो), सनामाचा चानू (75 किलो), पूनम (54 किलो), सुषमा (81 किलो) यांनी आपापल्या गटात सुवर्णपदके पटकावली. पुरुषांमध्ये सेलय सॉय (49 किलो), अंकित नरवाल (60 किलो) यांना अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. या स्पर्धेत भारताने एकूण 12 पदके पटकावली असून अरुंधती चौधरी (69 किलो), कोललप्रीत कौर (81 किलोवरील), जस्मिन (57 किलो), सतेंदर सिंग (91 किलो), अमन (91 किलोवरील) यांनी कांस्यपदके मिळविली आहेत.

सॉयने भारताच्या मोहिमेला सुरुवात केली. पण त्याला कझाकच्या बाझरबे उलु मुखामेदसैफीकडून हार पत्करावी लागली तर नरवालला जपानच्या रेइतो त्सुत्सुमेकडून पराभव स्वीकारावा लागला. पूनमने चीनच्या वेईकी काइचा पराभव करून भारताचे सुवर्ण खाते उघडले. सुषमाने कझाकच्या बाकित्झान्कीझीवर मात करून त्यात आणखी एका सुवर्णाचे भर घातली. नाओरेम चानूने कझाकच्या ऍनेल बरकीयाहचा, विन्काने चीनच्या हैनी नुलाताइयालीचा, सनामाचा चानूने उझ्बेकच्या नवबाखोर खामिदोव्हाचा पराभव करून सुवर्णपदके मिळविली.

Related posts: