|Thursday, December 12, 2019
You are here: Home » leadingnews » न्या. शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ

न्या. शरद बोबडे यांनी घेतली सरन्यायाधीशपदाची शपथ 

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे यांनी आज देशाचे 47 वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी बोबडे यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली.

यापूर्वीचे सरन्यायाधीश न्या. रंजन गोगोई अंदाचे 13 महिन्यांच्या कारकिर्दीची अयोध्या निकालाने सांगता करून रविवारी सायंकाळी निवृत्त झाले. आपले उत्तराधिकारी म्हणून न्या. बोबडे यांच्या नावाची शिफारस महिनाभरापूर्वी त्यांनी केली होती. त्यानुसार 30 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपतींनी न्या. बोबडे यांची 18 नोव्हेंबरपासून सरन्यायाधीश म्हणून नेमणूक केली.

अयोध्या निकालप्रक्रियेमध्ये न्यायमूर्ती शरद बोबडे यांची महत्त्वाची भूमिका आहे. सरन्यायाधीशपदी त्यांची निवड सेवाज्येष्ठतेनुसार झाली आहे. न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द 17 महिन्यांची असेल आणि ते सरन्यायाधीश पदावरून 23 एप्रिल 2021 या दिवशी निवृत्त होतील.

Related posts: