|Sunday, December 15, 2019
You are here: Home » leadingnews » राज्यसभेची 250 सत्रं म्हणजे एक विचारधारा : नरेंद्र मोदी

राज्यसभेची 250 सत्रं म्हणजे एक विचारधारा : नरेंद्र मोदी 

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली : 

संसदेचं हिवाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज, पहिल्या दिवशी राज्यसभेला संबोधित केलं. यावेळी ते म्हणाले, राज्यसभेची 250 सत्रं म्हणजे एक विचारधारा आहे. या सभागृहात अनेक सदस्यांनी इतिहास घडवला आहे, इतिहास घडताना पाहिला आहे. अनेक दिग्गज सदस्यांनी या सदनाचे नेतृत्त्व केलं आहे ही बाबही अभिमानास्पद आहे असंही मोदींनी म्हटलं आहे.

यावेळी मोदींनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल या दोन पक्षांचं कौतुक केलं. या दोन्ही पक्षांचे खासदार कधीच वेलमध्ये उतरत नाहीत. या दोन्ही दलांकडून आपण सर्वांनी धडा घ्यायला हवा. भाजपनंही शिकायला हवं, असं मोदी म्हणाले.

आजपर्यंत संसदेची परंपरा आणि प्रवास प्रेरणादायी होता. आजपासून  सुरु झालेल्या या अधिवेशनात या सत्रात काही वाद-विवाद होतील, मात्र, चांगल्या चर्चा व्हाव्यात, अशी आशा मोदी यांनी व्यक्त केली आहे.

 

 

Related posts: