|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » हर्बर्ट-मेहुत दुहेरीचे विजेते

हर्बर्ट-मेहुत दुहेरीचे विजेते 

वृत्तसंस्था/ लंडन

पीयर हय़ुजेस हर्बर्ट व निकोलस मेहुत या फ्रान्सच्या जोडीने एटीपी फायनल्समधील दुहेरीचे जेतेपद पटकावले. मागील वर्षी त्यांचे जेतेपद अगदी थोडक्यात हुकले होते. पण यावेळी त्यांनी त्याची भरपाई केली.

सातव्या मानांकित या फ्रान्सच्या जोडीने पाचव्या मानांकित रॅव्हेन क्लासेन (द.आफ्रिका) व मायकेल व्हीनस (न्यूझीलंड) यांचा अंतिम लढतीत 6-3, 6-4 असा पराभव केला. त्यांनी सलग सातवा विजय मिळवित जेतेपद पटकावले. 70 मिनिटांच्या खेळांत त्यांना चार ब्रेक पॉईंट्सना सामोरे जावे लागले. पण ते त्यांनी वाचवले. गेल्या महिन्यातील पॅरिस मास्टर्स स्पर्धेपासून हर्बर्ट-मेहुत यांनी सर्व 18 सेट्स जिंकले आहेत. करीयर ग्रँडस्लॅम मिळविलेल्यांपैकी ही स्पर्धा जिंकणारी 2015 नंतरची ही पहिलीच जोडी आहे. 2015 मध्ये जीन ज्युलियन रॉजेर व होरिया तेकॉ यांनी हा पराक्रम केला होता. एटीपी टूरवरील त्यांचे हे एकूण 15 वे जेतेपद आहे. या वर्षीच त्यांनी ऑस्ट्रेलियन ओपन व पॅरिस मास्टर्स स्पर्धेत जेतेपद मिळविले होते. ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकून त्यांनी करीयर ग्रँडस्लॅम साधणारी आठवी जोडी होण्याचा मान मिळविला होता.

Related posts: