|Saturday, December 7, 2019
You are here: Home » क्रिडा » भारतीय हॉकी संघाच्या ऑलिंपिक तयारीला प्रारंभ

भारतीय हॉकी संघाच्या ऑलिंपिक तयारीला प्रारंभ 

वृत्तसंस्था/ भुवनेश्वर

2020 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय पुरूष हॉकी संघाच्या जोरदार तयारीला प्रारंभ झाला आहे. सोमवारपासून येथे भारतीय हॉकी संघाच्या राष्ट्रीय प्रशिक्षण सराव शिबिराला सुरूवात झाली.

टोकियो ऑलिंपिकसाठी पात्रतेच्या स्पर्धेत भारतीय पुरूष हॉकी संघाने रशियाचा पराभव करून या स्पर्धेतील आपले स्थान निश्चित केले. सोमवारपासून येथे भारतीय पुरूष हॉकी संघाच्या प्रशिक्षण सराव शिबिराला प्रारंभ झाला असून हे शिबीर तीन आठवडे चालणार आहे. 8 डिसेंबरला या शिबिराची सांगता होईल. या शिबिरानंतर भारतीय हॉकी संघासाठी काही कालावधीसाठी कोणतीही स्पर्धा नाही. भुवनेश्वरच्या सराव शिबिरात संघातील प्रत्येक खेळाडूंच्या कामगिरीत सुधारणा होण्यासाठी लक्ष केंद्रीत करण्यात येणार असल्याचे प्रमुख प्रशिक्षक ग्रॅहॅम रिड यांनी सांगितले. ओदिशाच्या राजधानीत असलेल्या कलिंगा स्टेडियमवर सुरू झालेल्या सराव शिबिरात भारताच्या 33 संभाव्य हॉकीपटूंचा समावेश आहे. येत्या जानेवारीमध्ये भारत आणि हॉलंड यांच्यात दोन हॉकी सामने खेळविले जाणार आहेत.

भारतीय संभाव्य हॉकी संघ- गोलरक्षक- पी.आर. श्रीजेश, सूरज करकेरा, कृष्णन बहाद्दूर पाठक, बचावफळी- हरमनप्रित सिंग, वीरेंद्र लाक्रा, सुरेंद्रकुमार, अमीत रोहिदास, वरूणकुमार, रूपिंदरपाल सिंग, गुरिंदर सिंग, कोठाजीत सिंग, नीलम संजिप झेस, जर्मनप्रित सिंग, डी. तिर्की, मध्यफळी- मनप्रित सिंग, सुमीत, नीलकांत शर्मा, जेसकरण सिंग, हार्दिक सिंग, विवेक सागर प्रसाद, आशिशकुमार टोपो, सय्यद नियाज रहीम, राजकुमार पाल, आघाडीफळी- मनदीप सिंग, आकाशदीप सिंग, शिलानंद लाक्रा, गुरूसाहिबजीत सिंग, समशेर सिंग, सिमरनजीत सिंग, एस.व्ही. सुनील, गुरूजंत सिंग, रमणदीप सिंग आणि ललितकुमार उपाध्ये.

Related posts: