|Friday, December 13, 2019
You are here: Home » क्रिडा » कोरिया मास्टर्स स्पर्धेत श्रीकांत, समीरवर मदार

कोरिया मास्टर्स स्पर्धेत श्रीकांत, समीरवर मदार 

वृत्तसंस्था/ ग्वांग्झू

आजपासून सुरु होणाऱया कोरिया मास्टर्स स्पर्धेत स्टार बॅडमिंटनपटू किदाम्बी श्रीकांत व समीर वर्मा यांच्यावर भारताची भिस्त असणार आहे. सलग पाच स्पर्धेत पराभव स्वीकाराणाऱया सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. पुरुष दुहेरी गटातही भारतीय खेळाडू सहभागी होणार नाहीत.

  गत आठवडय़ात हाँगकाँग ओपनमध्ये उपांत्य फेरी गाठणाऱया किदाम्बी श्रीकांतकडून या स्पर्धेत दमदार कामगिरीची अपेक्षा असेल. त्याची सलामीची लढत हाँगकाँगच्या वोंग व्हिन्सेंटशी होईल. जागतिक क्रमवारीत 13 व्या स्थानी असणाऱया श्रीकांतने व्हिन्सेंटविरुद्ध 10 लढती जिंकल्या असून तीन लढती गमावल्या आहेत. याशिवाय, पुरुष गटात युवा खेळाडू समीर वर्माचा सलामीचा सामना चीनच्या शी युकीशी होणार आहे. याशिवाय, शुभंकर डे या स्पर्धेत सहभागी होत असून त्याची लढत चीनचा दिग्गज खेळाडू चेन लाँगशी होईल.

  महिला एकेरीत सायना नेहवाल व पीव्ही सिंधू यांनी या स्पर्धेतून माघार घेतली आहे. अलीकडे झालेल्या चायना, हाँगकाँग, प्रेंच तसेच डेन्मार्क ओपन स्पर्धेत या स्टार खेळाडूंना सातत्याने अपयशाचा सामना करावा लागला होता. विश्रांतीसाठी सायना व सिंधूने या स्पर्धेतून माघार घेतली आहे. आता, पुढील आठवडय़ापासून चालू होणाऱया सय्यद मोदी बॅडमिंटन स्पर्धेत त्या सहभागी होतील. याशिवाय, पुरुष, महिला व मिश्र दुहेरी एकाही भारतीय जोडीने सहभाग नोंदवलेला नाही.

Related posts: