|Friday, January 24, 2020
You are here: Home » क्रिडा » क्रिकेटपटू शाहदत हुसेन निलंबित

क्रिकेटपटू शाहदत हुसेन निलंबित 

वृत्तसंस्था/ ढाक्का

बांगलादेशचा माजी वेगवान गोलंदाज शहदात हुसेन याने येथे सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रिकेट लीग स्पर्धेत खेळताना आपल्याच संघातील अराफत सनी याच्यावर हल्ला केल्याने हुसेनवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

राष्ट्रीय क्रिकेट लीग स्पर्धेतील ढाक्का आणि खुलना यांच्यात हा सामना खुलना येथे खेळविला गेला. सामन्यातील खेळाच्या दुसऱया दिवशी ही घटना घडली. शहदात हुसेनने 2005 ते 2015 या कालावधीत बांगलादेश संघाचे प्रतिनिधीत्व करताना 100 पेक्षा अधिक बळीं घेतले आहेत. शहदात हुसेनने शिस्तपालन नियमाचा भंग केल्याने त्याच्यावर एक वर्षांची बंदी तसेच 50,000 रूपयांचा दंड अशी तरतूद होवू शकते. 33 वर्षीय शहदात हुसेनने 38 कसोटी, 51 वनडे आणि 6 टी-20 सामन्यात बांगलादेशचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Related posts: