|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जिल्हयातील रस्ते डांबरीकरणात मक्तेदारांची मनमानी

जिल्हयातील रस्ते डांबरीकरणात मक्तेदारांची मनमानी 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गेल्या पाच वर्षात मक्तेदारांनी केलेल्या डांबरीकरण कामांच्या दर्जाबाबत प्रश्न निर्माण झालेला आहे. रत्नागिरी जिल्हय़ात लांजा, राजापूर, देवरूख, संगमेश्वर आणि रत्नागिरी मधील रस्त्यांची ही कामे शासकीय निधीतून करण्यात आली. पण आज डांबरीकरण करण्यात आलेले सर्व रस्ते मक्तेदारांच्या मनमानीमुळे दर्जाहीन व निकृष्ट झालेले असल्याची तक्रार संजय गांधी निराधार योजना रत्नागिरीचे माजी अशासकीय सदस्य नित्यानंद दळवी यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मांडली आहे.

रत्नागिरी जिल्हय़ांतर्गंत आज रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे शासकीय निधीतून मंजूर झाली. सार्वजनिक बांधकामा विभागामार्फत करण्यात आलेल्या सर्व रस्ते 1 व 2 वर्षाच्या आतच खड्डेमय झालेले आहेत. त्यामुळे झालेल्या रस्त्याचा वापराचा फायदा जनतेला व पर्यटकांना न मिळाल्यामुळे रोजगार व्यवसाय व पर्यटन यावर झाला आहे. त्यामुळेच पर्यटनापासून जो रोजगार व उद्योगधंदे यांना फटका बसला आहे. गेल्या दोन वर्षात मक्तेदारांनी या कामांत मनमानी केल्याचा आक्षेपही दळवी यांनी घेतला आहे. याबाबतीत मक्तेदारांवर कोणतेही कायदेशीर कारवाई केलेली नसल्याचे निदर्शनास येत असल्याचे दळवी यांचे म्हणणे आहे. याला सर्वस्वी जबाबदार बांधकाम खाते असल्याचा आक्षेपही त्यांनी घेतला.

त्यासाठी या वर्षांपासून सुरू होणाऱया रस्त्यांच्या डांबरीकरणाची कामे दर्जेदार होण्यासाठी काम करतेवेळी जो अभियंता कामाचे मोजमाफ लिहीणार आहे. त्या अभियंत्याने कामाचे सुरूवातीपासून काम संपेपर्यंत कामाचे जागेवर उपस्थित रहाणे गरजेचे आहे. काम सुरू केल्यानंतर निविदेमध्ये नमुद केलेली मशिनरी कामाचे जागेवर सुस्थितीत असणे गरजेचे आहे. याची संबधित अभियंताने खात्री करून काम सुरू करण्याची परवानगी दय़ावी. प्रत्यक्ष कामाच्या वेळी सेनसार पेवर वापरण्यात यावा. आदी गोष्टींवर लक्ष ठेवण्यासाठी माजी खासदार निलेश राणे यांच्यासह त्यांचे कार्यकर्ते प्रत्येक कामाचे ठिकाणी पाहणी करून योग्य ती कायदेशीर उपाययोजना करण्यासंदर्भात सर्तक राहणार असल्याचे दळवी यांनी सांगितले.

Related posts: