|Sunday, December 15, 2019
You are here: Home » उद्योग » आयटी क्षेत्रातील 40 हजार नोकऱयांवर गदा?

आयटी क्षेत्रातील 40 हजार नोकऱयांवर गदा? 

आर्थिक मंदीचा रोजगारावर परिणाम : इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांची माहिती

वृत्तसंस्था/ बेंगळूर

आयटी क्षेत्रातील 30 ते 40 हजार नोकऱयांवर गदा येण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. आर्थिक मंदीमुळे देशातील रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून आयटी क्षेत्रातील नोकरदारांवर संकट उभे आहे, अशी शक्यता इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांनी वर्तवली आहे. आयटी उद्योगात दर पाचवर्षाला हजारो लोकांनी नोकरी गमवाली आहे, असेही पै यांनी सांगितले.

एखाद्या कंपनीचा भरभराट, विकास होतो तेव्हा कंपनीतील नोकरदारांना पदोन्नतीसह पगारवाढही मिळते. मात्र कंपनीची भरभराट आणि विकास खुंटतो, तेव्हा कंपनी व्यवस्थापनाला कंपनीच्या पिरॅमिडकडे पाहावे लागते. या वेळी अधिक  पगार घेणाऱया उच्च आणि मध्यम श्रेणीतील कर्मचाऱयांना सर्वात अगोदर नोकरी गमवावी लागते. दर पाच वर्षाला प्रत्येक कंपनीत या प्रकारचीच परिस्थिती निर्माण होते. आयटी क्षेत्रामधील ज्या लोकांना नोकरी गमवावी लागणार आहे, त्यांना दुसरीकडे संधीही लगेच मिळेल. पण त्यासाठी त्यांना काळाबरोबर स्वत:त बदल करावे लागतील, असेही त्यांनी सांगितले.

उद्योग मॅच्युअर्ड होतो अन् जाते नोकरी…

उद्योग स्थिरावतो, त्यात काही बदल होतात, तेव्हा मध्यम श्रेणीतील कामगार  पगाराच्या तुलनेत कंपनीला योगदान देण्यात कमी पडतात. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात प्रत्येक देशात जेव्हा एखादा उद्योग मॅच्युअर्ड होतो, तेव्हा लोकांना नोकरी गमवावी लागते, असे मोहनदास पै यांनी स्पष्ट केले.

Related posts: