|Friday, December 6, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » ममता अन् ओवैसी यांच्यात जुंपली

ममता अन् ओवैसी यांच्यात जुंपली 

  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम)  प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांच्यात वाप्युद्ध पेटले आहे. अल्पसंख्याक समुदायात काही जण कट्टरवादी आहेत. अशा लोकांपासून दूर राहण्याची गरज असल्याचे ममतांनी सोमवारी म्हटले होते. ममतादीदींचे विधान त्यांची भीती आणि निराशा दर्शवित असल्याचे प्रत्युत्तर ओवैसी यांनी मंगळवारी दिले आहे.

हिंदू कट्टरवाद्यांप्रमाणेच अल्पसंख्याकांमध्येही कट्टरवादी दिसून येत आहेत. एक राजकीय पक्ष भाजपकडून पैसे घेत आहे. हा पक्ष पश्चिम बंगालमधील नसून हैदराबादचा आहे. हैदराबादच्या कट्टरवाद्यांचे ऐकू नका, अशा शक्तींवर विश्वास ठेवू नका असे उद्गार ममतांनी काढले होते. ममतांच्या विधानातून पश्चिम बंगालमध्ये एआयएमआयएम मोठी शक्ती म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा दावा ओवैसी यांनी केला आहे.

 ममतादीनी काही ‘हैदराबादी’ंमुळे चिंतेत पडल्या असतील तर त्यांनी राज्यातील 42 पैकी 18 लोकसभा मतदारसंघांमध्ये भाजप कसा विजयी झाला हे सांगावे असे उपरोधिक विधान ओवैसी यांनी केले आहे.

ममतांकडून मुस्लिमांचा अपमान

एआयएमआयएम न्याय आणि अधिकारांसाठी लढत आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री याकडे कट्टरवाद म्हणून पाहत असल्यास मी काहीच करू शकत नाही. ममतादीदींच्या पक्षाला 100 टक्के मुस्लिमांनी मते देऊनही भाजपला रोखण्यास त्यांना  अपयश आले आहे. ममतादीदी मला शिव्या देऊन राज्यातील मुस्लिमांचा अपमान करत असल्याचे उद्गार ओवैसी यांनी काढले आहेत.

ममतांची मंदिरात धाव

ममता बॅनर्जी यांनी कूचबिहार येथील मदनमोहन मंदिरात जात पूजा केली आहे. अल्पसंख्याकांविषयी ममतांचे विधान तसेच मंदिराला भेट देण्याचा प्रकार पाहता त्या आता हिंदू मतदारांना आकर्षित करू पाहत असल्याचे मत राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.

Related posts: