|Sunday, December 8, 2019
You are here: Home » क्रिडा » दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंजांचा सहभाग नाही

दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंजांचा सहभाग नाही 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

2020 साली होणाऱया टोकियो ऑलिंपिक स्पर्धेसाठी भारतीय तिरंदाज सध्या जोरदार तयारी करीत आहेत. तथापि नेपाळमध्ये 1 ते 10 डिसेंबर दरम्यान होणाऱया दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंदाज सहभागी होणार नसल्याचे सांगण्यात आले. अखिल भारतीय तिरंदाज संघटनेतर्फे ही माहिती देण्यात आली.

विश्व तिरंदाजी फेडरेशनने भारतीय तिरंदाजी फेडरेशनवर निलंबनाची कारवाई केली असल्याने नेपाळमध्ये होणाऱया आगामी ऑलिंपिक पात्र फेरीच्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारतीय तिरंदाजांना तिरंगा ध्वजाखाली सहभागी होण्यास मनाई केली आहे. या संदर्भात ढाक्का येथे झालेल्या दक्षिण आशियाई तिरंदाज फेडरेशनच्या बैठकीत भारतीय तिरंदाजांना नेपाळमधील स्पर्धेत सहभागी होण्यास रितसर परवानगी मिळू शकली नाही.

Related posts: