|Thursday, December 12, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » ट्रॉली पलटी झाल्याने चालक जागीच ठार

ट्रॉली पलटी झाल्याने चालक जागीच ठार 

हुपरी येथील घटना : मृत रेंदाळचा

हुपरी/ वार्ताहर

हुपरी (ता. हातकणंगले) येथील हुपरी-रेंदाळ रोडवरील व्यंकटेश शाळेसमोर मंगळवारी दगडाने भरलेल्या ट्रक्टरचा ऍक्सल तुटून ट्रॉली पलटी झाल्याने चालक  जागीच ठार झाला. गणेश राजाराम वडर (वय 23, रा. शाहूनगर, रेंदाळ) असे मृत  चालकाचे नाव आहे. या अपघाताची नोंद हुपरी पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती.

   पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, रेंदाळ  लक्ष्मी नगर येथे गणेश वडर हा आपल्या आई वडीलसह राहात होता. मंगळवारी गणेश वडर हा आपल्या मालकीच्या ट्रक्टर-टॉलीमधून दगड भरुन बिरदेव नगर मार्गे हुपरीकडे नेत होता. व्यंकटेश शाळेसमोर ट्रक्टर आला असता समोरुन येणाऱया मालवाहतुकीचा टेम्पो आल्याने ट्रक्टर चालक गणेश वडरने जोरात ब्रेक मारला. ट्रक्टरमध्ये मोठय़ा प्रमाणात दगड भरले असल्यामुळे ट्रक्टरचे ऍक्सल तुटल्यामुळे मागील ट्रॉली चरीत कोसळली. त्यावेळी चालक गणेश वडर हा त्याखाली सापडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळाचा हुपरी पोलिसांनी पंचनामा करुन हुपरी प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. याबाबत राजाराम वडर यांनी फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक राजेंद्र मस्क यांच्या मार्गदर्शनाखाली, हवालदार प्रकाश सणगर करत आहेत.

Related posts: