|Friday, December 13, 2019
You are here: Home » Automobiles » मारुतीची ‘एस-प्रेसो’ पहिल्याच महिन्यात टॉप 10 मध्ये

मारुतीची ‘एस-प्रेसो’ पहिल्याच महिन्यात टॉप 10 मध्ये 

 ऑनलाईन टीम / पुणे :

‘मारुती सुझुकी’ची ‘एस-प्रेसो’ ही कार पहिल्याच महिन्यात सर्वाधिक विकल्या गेलेल्या कारमध्ये पहिल्या दहा कारमध्ये आली आहे.

मारुती सुझुकीकडून ही छोटी एसयूव्ही अरीना डीलरशीपकडून विकली जात आहे. मारुतीने 30 सप्टेंबर रोजी ‘एस-प्रेसो लाँच केली होती. लाँचिंगनंतर 11 दिवसातच या कारसाठी 10 हजारपेक्षा जास्त ग्राहकांनी बुकिंग केली होती. या कारला बाजारात जोरदार प्रतिसाद मिळत आहे.

ऑक्टोबर महिन्यात या कारचे 10 हजार 634 युनिट्स विकले गेले. एस प्रेसोमध्ये 10 पेक्षा जास्त सेफ्टी फीचर्स देण्यात आले आहेत. ईबीडीसह एबीएस, ड्रायव्हर साईड एअरबॅग्ज, रिअर पार्किंग सेन्सर्स, सीट बेल्ट रिमाइंडर आणि स्पीड अलर्ट सिस्टम असे फीचर्स यामध्ये आहेत. एस-प्रेसोमध्ये 1.0 लिटर बीएस 6 उत्सर्जन मानकांचे इंजिन आहे. या इंजिनकडून 67 एचपी पॉवर आणि 90 एनएम टॉर्क जनरेट केला जातो. ही कार मॅन्यूअल आणि ऍटोमॅटीकमध्येही उपलब्ध आहे. मारुती एस-प्रेसोची किंमत 3.69 लाखांपासून ते 4.91 लाख रुपयांपर्यंत आहे.

 

 

 

 

 

Related posts: